जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा,एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 15 दिसंबर 2018

जम्मू-काश्मीरच्या पुलवामात 3 दहशतवाद्यांचा खात्मा,एक जवान शहीद, इंटरनेट सेवा खंडित.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर या चकमकीत एक जवान शहीद झाला असून, एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालं आहे. राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबची हत्या करणाऱ्यांमध्ये जहूरचंही नाव होतं. सुरक्षा जवानांनी त्याचा खात्मा करून मोठं यश मिळवलं आहे.
परंतु अद्यापही दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सर्च ऑपरेशन राबवलं जातं आहे. अनेक तास चाललेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांना हिजबुलचा कमांडर जहूर ठोकर याचा खात्मा करण्यात यश आलं आहे. यादरम्यान एक जवानही जखमी झाला आहे. सध्या तरी सुरक्षा जवानांचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांशी चकमक सुरू असताना सुरक्षा जवानांची स्थानिक लोकांशी वाद झाला, त्यादरम्यान अनेक जण जखमी झाले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें