छिंदमच्या निवडीला न्यायालयात आव्हान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 दिसंबर 2018

छिंदमच्या निवडीला न्यायालयात आव्हान.


महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या वादग्रस्त श्रीपाद छिंदमच्या निवडीला आव्हान देणारी याचिका जिल्हा न्यायालयात दाखल करण्यातआली आहे. छिंदमची निवड सदोष निवडणूक प्रक्रियेतून झाल्याचा दावा याचिकाकर्ते निलेश म्हसे यांनी केला आहे.सार्वत्रिक निवडणुकीवेळी मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश म्हसे यांनी ‘प्रभाग 9 क’ मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जांच्या छाननीवेळी म्हसे यांनी श्रीपाद छिंदमसह इतर सर्व उमेदवारांच्या अर्जातील त्रूटींसंदर्भात हरकत नोंदविली होती. ही हरकत निवडणूक अधिकार्यांनी फेटाळून लावली होती. निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या या निर्णयाला म्हसे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर कायद्यातील तरतुदींनुसार निवडणूक याचिका (इलेक्शन पिटीशन)दाखल करण्याचे निर्देश म्हसे यांना दिले होते. निवडणूक पार पडल्यानंतर म्हसे यांनी कायद्यातील तरतुदींनुसार नगर येथील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात श्रीपाद छिंदमसह इतर 7 उमेदवार व राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. श्रीपाद छिंदम याची निवड सदोष निवडणूक प्रक्रियेतून झाल्याचा दावा करत, त्याची निवड रद्द करण्याची मागणी निलेश म्हसे यांनी केली आहे. म्हसे यांच्यावतीने अॅड. सुहास टोणे काम पाहात आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें