जय भवानी नगर - श्रीकृष्ण नगर - जैनोद्दीन काॅलनी परिसरातील नागरिकांसी संवाद;
सिल्लोड (प्रतिनिधी)दि 05/12/2018.सिल्लोड शहरासाठी खडकपुर्णा वाढीव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने सिल्लोड शहरातील नागरिकांना पाणी टंचाई उद्भभवणार नाही तसेच शहरासाठी भूमीगत गटार योजना राबविण्यात येणार असल्याने गटार - नाली - दुर्गंधीचा प्रश्नही मिटेल. नव्याने पुल - सिमेंट रस्ता कामे प्रगती पथावर असुन अनेक ठिकाणचे नादुरुस्त वीजेची पोलची कामे हाती घेण्यात येणार असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.
सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. सिल्लोड शहरातील जय भवानी नगर,श्रीकृष्ण नगर, जैनोद्दीन काॅलनी येथील नागरिकांच्या दारोदार जाऊन विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत घरकुल - रस्ते - पाणी - वीज या मुलभूत सुविधांसह व इतर अनेक समस्यांचे निवारण करण्यात आले . ठिक ठिकाणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांचे नागरिकांनी स्वागत करण्यात आले .
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, देविदास पाटील लोखंडे,रमेश पाटील साळवे, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, शंकरराव खांडवे,शेख बाबर बागवान, विठ्ठलराव सपकाळ,रऊफ बागवान,शांतीलाल अग्रवाल, रईस मुजावर पठाण,अकिल वसईकर,संजय आरके,सतीश ताठे, कैसर आझाद,राजरत्न निकम, संजय फरकाडे, राजु बागवान, राजरत्न निकम,सत्तार हुसैन, सलिम हुसैन,राजु गौर, सुनिल दुधे,मनोज झंवर,निजाम पठाण, लड्डू पटेल, मधूकर बेंडाळे,संजय मुरकुटे,दशरथ सुरडकर,कुणाल सहारे,मनोहर आरके,डाँ. फेरोज खान, अकिल देशमुख,मतीन देशमुख,मियाभाई, अमित आरके,गणेश डकले, राजेश्वर आरके, शेख आबेद,जितू आरके,अफजल बेग,इम्रान कुरैशी,सखाराम अहिरे,अब्दुल बासित, जगन्नाथ कुदळ,फईम पठाण,रवि आरके,जुम्माखा पठाण, बबलू पठाण, भावराव दुधे, काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने अडचणीत ;शहरातील नागरिकांच्या दारोदार जाऊन विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत असतांनाच अनेक किराणा दुकानदार - व्यापारी वर्गाशी दुष्काळी परिस्थिती बरोबरच नोटाबंदीमध्ये आपल्या व्यवसायांवर काही परिणाम झाला आहे का ? असे आ.अब्दुल सत्तार यांनी विचारले असता दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसाय डबघाईला आले असुन नोटाबंदीमुळे तर आर्थिक कोंडीच झाली असल्याचे मतही अनेक शहरवासिय व्यवसायीकांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें