सोनपेठ प्रतिनिधी (मंजूर मूल्ला ) सोनपेठ शहरातील काही प्रभागात मेन पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे काम करण्या करता खंदलेल्या खड्डे नागरिकांच्या जिवावर उठले आहेत तरी संबंधित अधिकारी यांनी लक्ष घालून त्वरित खड्डे दुरूस्तीचे काम चालू करण्याची मागणी या भागातील नागरिकांन कडून होत आहे. .स्वच्छ ,सुंदर शहर अशी ओळख असणाऱ्या सोनपेठ शहरातील प्रभाग क्र(७) व प्रभाग क्रमांक (८) मधील रस्त्याची अवस्था एखाद्या कोड पुढल्या रोग्या प्रमाणे झाली आहे. हे प्रभाग खड्डेमय झाले आहे या रस्त्यावरून वाहनचालकांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे खड्डे चुकविताना अनेक वाहनेचालकांना गंभीर प्रकारची मार लागली असुन नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात बसालेल्या एका कडूनही या खड्ड्या बाबत संबधितास बोलण्याचे धाडस झालेली दिसत नाही या मुळे नागरिकांच्या चर्चेतुन न.प.त बसलेल्या सताधारी व विरोधी गटाच्या विरोधात नाराजीचा सुर उमटू लागले आहे.या खड्ड्यापासुन येथील नागरिक त्रस्त झाले आहेत नगर पालिका प्रशासन या जनतेच्या समस्या वरती जागचे हलायला तयार नाही पावसाने झोडपले आणि राजाने मारले तर सांगायचे कोणाला अशी परिस्थिती या प्रभाग ७ आणी प्रभाग ८ मधील नागरिकांची झाली आहे. तरी नगर पालिकेच्या सिऔ दादा जरा नागरिकांच्या प्रक्ष्ना वरती पण लक्ष द्या हो अशी विनंती पुर्वक चर्चा या भागातील नागरिकांच्या वतिने केली जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें