साईबाबा नागरी बँकेचा कर्मचारयांसाठी उपक्रम.
सेलू प्रतिनिधी
( सेलू ) मानवी जीवन हे अडथळ्यांची शर्यत आहे , दिवसेंदीवस सर्वच शासकीय निमशासकीय कार्यालये, सर्व बँका या ठीकाणी कामाची व्याप्ती वाढल्यामुळे कर्मचारी ताणतणावात येत आहेत, परंतू स्व़यंशिस्त आणी कर्तव्यनिष्ठा हाच तणावमुक्त जीवनाचा राजमार्गआहे त्याचा अंगीकार करावा असे आवाहन साईबाबा बँकेचे चेअरमन हेमंतराव आडळकर यांनी केले.
येथील साईबाबा नागरी सहकारी बँक , जनहीत कृषीविद्यान केंद्र , लक्ष्मीविष्णू समुपदेशन व व्यक्तीमत्वविकास केंद्र सेलू यांच्या संयुक्तविद्यमाने बँक कर्मचारयांसाठी आयोजीत ताणतणाव मुक्ती कार्यशाळेत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ते बोलत होते . या वेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन पतंजली योग समीतीचे जिल्हा प्रभारी धोंडीराम सेफ, प्रा. प्रकाश कुरूंदकर,समुपदेशर प्रविण सोनोणे , संचालक डी. व्ही. मुळे,, नारायणराव देऊळगावकर ,बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांची प्रमुख उपस्थिति होती. उपस्थित मान्यवरांनी ताणतनावाची कारणे, परीणाम ,उपाय तसेच ताणतणाव व्यवस्थापन कसे करावे या बाबत मार्गदर्शन करून कार्यशक्ती वाढवुन आनंदी जीवनाचा मंञ उपस्थित कर्मचारयांना दीला. दुसरया सञात कर्मचारयांनी विचारलेल्या अनेक समस्यांचे निराकरण चर्चासञात करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर. एस. लाडाणे, स्पुर्तीगीत सौ. पुजा महाजन (तोडकर) सुञसंचलन सुभाष मोहकरे तर दत्ताञय पौळ यांनी आभार मानले. कार्यक्रमा साठी संचालक सुभाष चव्हाण, राजेंद्र आंडळकर,व्यापारी नंदलाल परताणी, रतन दायमा ,संचालक, दत्तात्रय आंधळे, प्रवीण बिनायके शेख इम्रान, शाखाधिकारी अविनाश आडळकर, अभय सुभेदार, गुलाबराव सोनवणे, संतोष भोगावकर, निसार पठाण संतोष हुगे, लहू जायभाय, भास्कर आडळकर यांच्यासह 60 कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें