शेख सलिम.
भोकरदन (प्रतिनिधी ) भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिरवान दिनानिमित्त भोकरदन येथे विनम्र अभिवादन करण्यात आले.
शहरातील रमाई नगर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी गायक रमेश बिरारे यांनी श्रद्धांजली पर बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गायले . त्यानंतर सिल्लोड कॉर्नर वरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष यादवराव पगारे, पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष फकिरा देशमुख, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश औटी, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष महेश देशपांडे, नगरसेवक कदीर बापू, नगरसेवक दीपक बोर्डे, शामराव दांडगे, अॅड. डि . एस. जाधव, स्मारक समितीचे प्रमुख सचिन पारखे, बाबुराव पगारे, सुरेश बनकर, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप जोगदंडे, विशाल मिसाळ, रमेश बिरारे, श्रावण आकसे , प्रा . अशोक नवगिरे , प्रकाश सुरडकर, कैलास जाधव, सोमनाथ बिरारे, विजय दाभाडे, सांडू जगताप, सिद्धार्थ सोनवणे, रविदादा मोरे, युवराज पगारे, कमलकिशोर जोगदंडे, अरूण मोरे, संजय आढावे , भारत हिवराळे, रतन बनकर, प्रमोद रामटेके यांच्या सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें