डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुर्तीमंत ज्ञान - सुरेश हिवाळे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 दिसंबर 2018

डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मुर्तीमंत ज्ञान - सुरेश हिवाळे.


सेलू  : अथक परिश्रम,अठरा तास अभ्यास,वाचनाच्या माध्यमातून  विविध ज्ञानशाखेत प्रकांड पांडित्य मिळविलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मुर्तीमंत ज्ञान आहेत.असे मत नूतन विद्यालयात महापरिनिर्वाण दिना निमित्त्याने गुरुवार ( ता.०६ ) रोजी आयोजित अभिवादन कार्यक्रमात सुरेश हिवाळे यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साक्षात सकारात्मक ऊर्जा आहेत. आपल्या यशात कोणतीही प्रतिकुलता कधीच आड येत नसते.तर माणसांमध्ये ईच्छाशक्ती जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास असेल तर जगातील आपल्याला हवी ती गोष्ट मिळवणे,आपले निश्चित ध्येय साध्य होणे शक्य आहे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वउदहरण सिध्द केले आहे. विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अनुसरल्यास भविष्य उज्वल होइल.असेही सुरेश हिवाळे म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल कुलकर्णी हे होते.तर मंचावर उपमुख्याध्यापक अशोक गाजरे,पर्यवेक्षक मा.मा.सुर्वे,आर.जी.मखमले यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात जलतरण स्पर्धेत प्राविण्यप्राप्त गोरखनाथ राठोड या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काशिनाथ पल्लेवाड यांनी केले.तर आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष पाटील यांनी केले.
 सेलू : येथील नूतन विद्यालयात महापरिनिर्वाण दिना निमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले त्या प्रसंगी अनिल कुलकर्णी,अशोक गाजरे,मा.मा.सुर्वे,आर.जी. मखमले,संतोष पाटील,सुरेश हिवाळे,काशीनाथ पल्लेवाड.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें