पाथरी प्रतिनिधी.दि 13/12/2018.
कर्ज भेटत नसल्याने बँके समोर बुधवार 12 डिसेंबर पासून उपोषणाला बसलेल्या शेतक-याला -हदयविकाराचा जोरदार झटका आल्याने त्याचा दवाखाण्यात जाण्या पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी तीन ते चार च्या सुमारास घडली असून या घटने मुळे शेतक-यां मधून बँक प्रशासना विरोधात तिव्र संताप व्यक्त केला जात असून बँक अधिका-यां विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. दरम्यान संतप्त शेतक-यांनी मृतदेह बँकेत आणला आहे.
मागील अनेक दिवसा पासून भाकपाच्या नेतृत्वात शेतकरी पिककर्जा साठी स्टेटबँक ऑफ इंडीया समोर उपोषण आणि विविध आंदोलने करत होते ,प्रत्येक वेळी बँक अधिका-यांनी आश्वासनावर बोळवन केल्याने 12 डिसेंबर रोजी पुन्हा भाकपाच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते दरम्यान 13 डिसेंबर रोजी दुपारी तुकाराम वैजनाथराव काळे वय 42 या मरडसगाव ता पाथरी येथिल शेतक-याला -हदयाचा त्रास जाणऊ लागला त्याला तात्काळ दवाखान्यात हलवले मात्र प्रकर्ती चिंताजनक असल्याने त्यांना मानवत येथील शासकिय रूग्णालयात हलवण्यात आले मात्र तत्पुर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली. या विषयी पाथरी शहरातील बँके समोर वातावरण तणावपुर्ण झाले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें