सेलू प्रतिनिधी शमशेर खान.
सेलू तालुक्यातील सर्वजनिक बांधकाम विभागामार्फत विविध ठिकाणी रस्ता व पुलाची कामे सुरू आहेत ही कामे अतिशय संथगतीने चालू असून ठेकेदाराच्या सोयीनुसार चालू आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कामाची गती न वाढविल्यास 24 डिसेंबर रोजी लक्षणी उपोषण करण्याचा इशारा दबाव गटाने निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे सेलू तालुक्यात देवगाव फाटा सेलू परभणी सेलू पाथरी या रस्त्याची अस्वस्था अत्यंत वाईट झाली आहे मोरेगाव जवळील दुधना नदीवरील पूल अनेक वर्षांपासून सुरू झालेला नाही त्याच प्रमाणे सेलू रेल्वे स्थानक ते रायगड कॉर्नर दरम्यान दुभाजक व विद्युत खांब आणि त्यावरील सरक्षक तार बसविण्याचे काम पूर्ण झालेले नाही ही कामे ठेकेदाराच्या सोयीनुसार होणार आहे यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे या बाबीकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नाही ठेकेदाराने पैसे का दिले निधीचा गैरवापर याला जवाबदार व्यक्ती या प्रश्नावर दबावगट आंदोलन करणार आहे सेलू देऊळगावगात डासाळा या रस्त्याचे रखडलेले काम सुरु झाले होते पुन्हा हे काम बंद पडले आहे शासन जनतेकडून रस्त्याचा कर घेते चांगल्या सुविधा पुरवण्याची जवाबदारी देखील शासनाची आहे रखडलेल्या कामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा 24 डिसेंबर पासून लक्षनिक उपोषण करण्याचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दबाव गटाने दिला आहे निवेदनावर ॲड श्रीकांत वाईकर ॲड टि ए चव्हाण ओम प्रकाश चव्हाळ विशाल पटेल रामचंद्र कांबळे याच्या सस्वाक्षऱ्याआहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें