३१ डिसेंबर पर्यंत निळवंडे कालव्यांचे काम सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन-गंगाधर राहणे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 दिसंबर 2018

३१ डिसेंबर पर्यंत निळवंडे कालव्यांचे काम सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन-गंगाधर राहणे.



 शिर्डी प्रतिनिधी
कु.किरण जाधव.

उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्याना अडथळा आणणाऱ्या आ. वैभव पिचडांवर व काम बंद करणाऱ्या त्यांच्या बनावट समर्थकांवर गुन्हा दाखल करा अन्यथा नवीन वर्षात निळवंडे कालवा कृती समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करील असा इशारा समितीचे माजी उपाध्यक्ष गंगाधर राहणे यांनी राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे गावी शेतकऱ्यांनी सभा घेत निषेध व्यक्त केला त्यावेळी दिला आहे.
     सदरचे सविस्तर वृत्त असे की,निळवंडे कालवा कृती समितीने मोठा पाठपुरावा करून या प्रकल्पाच्या कालव्यांसाठी केंद्र सरकारकडून निधी मिळावा यासाठी केंद्रीय जल आयोगाकडून २०१४ अखेर चौदा व औरंगाबाद खंडपीठात जाऊन प्रसिद्ध वकील अजित काळे यांच्या माध्यमातून जनहित याचिका कर्ते विक्रांत काळे व नानासाहेब जवरे यांनी याचिका दाखल करून तीन अशा सतरा मान्यता मिळवून निधी मिळविण्याचा मार्ग मोकळा केला आहे.खंडपीठाने या प्रकल्पाला निधी देण्याचे आदेश २६ ऑक्टोबरला दिलेले आहे.आज निधी शिल्लक असतांना अकोले तालुक्यात काम चालू करण्यास जलसंपदा विभाग चालढकल करीत असून त्यामुळे प्रस्तावित लाभक्षेत्रातील १८२ गावातील शेतकऱ्यांत मोठा असंतोष धुमसत आहे..राज्याच्या जलसंपदा मंत्र्यांकडून १५८ कोटींचा निधी प्राप्त केला आहे.गट वर्षीचा ४८ कोटींचा निधी शिल्लक आहे नाबार्डकडून अजून जवळपास शंभर कोटींचा निधी मिळणार असून जवळपास तीनशे सहा कोटींचा निधी शिल्लक आहे.  या निधीतून केवळ अकोले तालुक्यातील शुन्य ते १८ कि.मी.या महत्वपूर्ण टप्प्यातील कालवे व नदी नाल्यावरील पूल व तत्सम कामे प्राधान्यक्रमाने करावे अशी मागणी करून त्याचा पाठपुरावा सातत्याने सप्रमाण केला आहे .अकोले तालुक्यातील कालव्यासाठी साधारण पस्तीस वर्षांपूर्वी भूसंपादन करून त्याचा मोबदला त्या शेतकऱ्यांना दिला आहे.या प्रकल्पाचे आधी पुनर्वसन व मग धरण अशी या प्रकल्पाची देशभर ख्याती मिळवली आहे.कालव्यांसाठी शंभर टक्के पुनर्वसन झाले आहे.त्या बाबत अकोले संगमनेर तालुक्यातील नेत्यांनी आपली पाठ थोपटून जवळपास दोन दशकांचा कालखंड लोटला आहे.त्यांना उर्वरित जमिनीस पाणी मिळून त्या बागायती व्हाव्यात यासाठी त्यांच्या मागणीनुसार जलसंपदा विभागाने उच्यस्तरीय कालवे करून त्यांचे शिल्लक क्षेत्राला पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे,त्यांच्या उपसा सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे.त्यामुळे त्यांचे जवळपास आठ हजार आठशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे.त्यामुळे अकोले तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मिटला असल्याचे व आमची व आमच्या शेतकऱ्यांची कालव्यांसाठी कुठलीही तक्रार नाही असे त्यांच्याच लोकप्रतिनिधींनी ढोल बडवून वेळोवेळी जाहीर केले आहे.जलसंपदा विभागाचा तसा लेखी पुरावा  कालवा कृती समितीकडे आहे. तथापि राजकीय पाठिंब्यावर काही असामाजिक तत्वे मुद्दाम काम करण्यास अडथळा आणत आहे.त्यात खऱ्या शेतकऱ्यांचा समावेश अपवादात्मक आहे.  जलसंपदा विभाग व संबंधित ठेकेदार,नेते यांची अभद्र युती होऊन आपल्या आर्थिक लाभासाठी  या अपप्रवृत्तीस पाठबळ पुरवीत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे.व किरकोळ विरोध दाखवून काम बंद ठेऊन जलसंपदाचा निधी हडप करण्याचे नसते उद्योग सुरु असल्याची बाब लपून राहिलेली नाही.त्यामुळे हा प्रकल्प ४८ वर्ष संपुनही पूर्ण झाला नाही.आता अधिकचा विलंब शेतकऱ्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम सुरु करतो असे लेखी आश्वासन कालवा कृती समितीस देऊनही अडीच महिने लोटले आहे तरी या विभागाला या कालव्याचे काम सुरु करण्यास पोलीस बळ मिळाले नाही,कृती समितीच्या ३० नोव्हेंबर व १७ डिसेंबरच्या आंदोलनानंतर मिळाले तर त्यांनी काम बंद करणाऱ्यांविरुद्ध हाताची घडी तोंडावर बोट ठेवून 'तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो" असा बनाव करून जिल्हाधिकाऱ्यांचे नाव पुढे करून काम बंद केले आहे.त्या नंतरही वेळोवेळी लेखी देऊनही त्याचे पालन केलेले नाही. हा बनाव कृती समितीस लक्षात आल्याने निळवंडे कालवा कृती समितीने आता हा लढा जनतेच्या दरबारात घेऊन जाण्याचा निर्धार करून गावोगाव निषेध सभांचे आयोजन सुरु केले असून त्याला लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.कोऱ्हाळे,केलवड येथे काल सकाळी आयोजित सभांमध्ये मोठा प्रतिसाद लाभला त्या वेळी गंगाधर राहणे बोलत होते.
     सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते नानासाहेब जवरे,नामदेवराव दिघे,कौसर सय्यद,संजय गुंजाळ,सोमनाथ दरंदले,मच्छीन्द्र दिघे,रमेश दिघे,रामनाथ बोऱ्हाडे,अशोक गांडूळे,संतोष तारगे,परबत डांगे,शरद गोर्डे,माणिक चांगले,देवराम भांबारे,पावलस कोळगे,बाळासाहेब वैद्य,रायभान डांगे,ज्ञानेश्वर डांगे,साहेबराव डांगे,नारायण डांगे,कारभारी वैद्य,हरिभाऊ उपाध्ये,आप्पासाहेब उपाध्ये,गोपीनाथ जाधव,गोरख जाधव,वामन बनसोडे,शिवाजी जाधव,विनायक लहामगे,किसान विखे,रवींद्र बनसोडे,देवराम कांदळकर,              आदींसह बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते.
      त्यावेळे पुढे बोलताना ते म्हणाले की,कालवा कृती समितीने संगमनेर येथे जलसंपदा विभागाच्या कार्यालयावर केलेल्या धरणे आंदोलनानंतर तेथील उपकार्यकारी अभियंता जनार्धन सहाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी अकोलेतील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.ते आश्वासन प्रशासनाने पाळले नाही तर त्या नंतर कृती समिती न भूतो असे तीव्र आंदोलन उभारणार आहे.शिवाय सध्या जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे कलम १४४ लागू केलेले आहे.त्यामुळे आंदोलन करणे योग्य होणार नाही अशी भूमिका मांडली आहे.
   सदर प्रसंगी पत्रकार नानासाहेब जवरे,संजय गुंजाळ,कौसर सय्यद ,गंगाधर गमे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्तविक सोमनाथ दरंदले यांनी केले,तर माणिक चांगले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 जलसंपदाचे उपकार्यकारी अभियंता जनार्धन सहाणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी अकोलेतील शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे.ते आश्वासन प्रशासनाने पाळले नाही तर त्या नंतर कृती समिती न भूतो असे तीव्र आंदोलन उभारणार आहे.शिवाय सध्या जिल्हा प्रशासनाने जमावबंदीचे कलम १४४ लागू केलेले आहे.त्यामुळे आंदोलन करणे योग्य होणार नाही अशी भूमिका कालवा कृती समितीने मांडली आहे.
   गावोगाव होणाऱ्या कालवा समितीच्या सभांना मोठा प्रतिसाद पाहून प्रस्थांपितांचे धाबे दणाणले आहे.त्यामुळे शासकीय पातळीवर हालचाल सुरु झाली असल्याचे वृत्त असून अकोलेतील प्रश्नावर उतारा मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें