सेलू प्रतिनिधी
सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सव २०१८चे आयोजन उद्या ता.२६ ते ३० डिसेम्बर २०१८ दरम्यान विद्याविहार संकुल येथे आयोजित करण्यात आला आहे
सुरभि महोत्सावाच्या स्पोर्ट्स डे (ता.२६) सकाळी ९.००वा या दिनी घटक संस्थेतील सर्व शाळाच्या विद्यार्थ्यांचे संचलन, लेझीम. अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण करतात. या सुरभि महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे , उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद चे सदस्य मा. राजेन्द्रकाका लहाने यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रेणुका वागळे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, स्काउट व गाईड विभागाचे जिल्हा मुख्य आयुक्त मा.संतोष बोबडे, संभाजी ब्रिगेड चे विभागीय अध्यक्ष मा.बालाजी शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ज्ञानतीर्थ विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम “ रंग मराठी मातीचा ” तसेच शिवरायांची संगीतमय यशोगाथा “शिवसोहळा” या नाटिकेचे सादरीकरण (ता.२७) डिसे. वेळ सायं.०५ वा विद्यालयाचे विद्यार्थी करणार आहेत. या दिनी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे , उद्घाटक म्हणून सेलू जिंतूर विधानसभेचे आमदार मा. विजयरावजी भांबळे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मा.उज्ज्वलाताई राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी मा.उमाकांत पारधी, जि.पचे अर्थ व बांधकाम सभापती मा. अशोक काकडे, तहसीलदार मा. आसाराम छडीदार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रिन्स आदिवासी प्रकल्प सांस्कृतिक कार्यक्रम “ महाराष्ट्राची लोकधारा ” (ता.२८) डिसे. वेळ सकाळी ११ वा आयोजन करण्यात आला आहे. या दिनी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे , उद्घाटक म्हणून वैदकीय अधिकारी मा.संजय हरबडे यांच्या हस्ते होणार असून आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत
प्रिन्स इंग्लिश स्कुल सांस्कृतिक कार्यक्रम “ challenge yourself ” (ता.२८) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आला आहे. या दिनी अध्यक्षस्थानी संस्थेचे मार्गदर्शक डॉ रामरावजी रोडगे , उद्घाटक म्हणून विधानपरिषदेचे आमदार मा. बाबाजानी दुर्राणी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पाथरी न.प.चे नगराध्यक्ष मा. जुन्नेद दुर्राणी, जि.पचे सदस्य मा. राम नाना खराबे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
क्युरिअस कीड्स व प्रिन्स अकडमी सांस्कृतिक कार्यक्रम “ Around the world ” (ता.२९) डिसे. वेळ सायं.०५ वा आयोजन करण्यात आला आहे. या दिनी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे , उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री मा. बबनरावजी लोणीकर यांच्या हस्ते होणार आहे. तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून जि.पच्या उपाध्यक्षा मा. भावनाताई नखाते, सेलु न.प.चे नगराध्यक्ष मा. विनोद बोराडे, मानवत न.प.चे नगराध्यक्ष मा.अंकुश लाड, प्रदेशाध्यक्ष आय. ई. एस. ए. चे मा. राजेंद्र दायमा, भाजपा युवा नेते मा. सुरेश नागरे, शिवसेना जालना जिल्हाप्रमुख मा. ए. जे बोराडे, शिवसेना परभणी जिल्हाप्रमुख मा. सुरेशबप्पा ढगे, साई बाबा नागरी सह. बँकचे अध्यक्ष मा. हेमंतराव आडळकर, प्रदेश सचिव आय. ई. एस. ए. चे मा.भरत भांदरगे, उद्योगपती मा. नंदकिशोर बाहेती आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अपूर्वा पाँलीटेक्निक, डी.एड, बीएड चा सांस्कृतिक कार्यक्रम व आनंद मेळावा (ता.३०) डिसे. वेळ साय ०५ वा आयोजन करण्यात आला आहे. या दिनी अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे , उद्घाटक म्हणून माजी नगरसेविका मा.रोहिणीताई राजूरकर यांच्या हस्ते होणार असून न.प. सदस्या मा.शोभा कोरडे, राजस्थानी महिला मंडळाचे अध्यक्षा मा. कांचन बाहेती, मा.लताताई गिल्डा आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत
या सुरभि महोत्सवप्रसंगी सेलू शहरातील सर्व नागरिकांनी , शालेय पालकांनी वरील कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष तथा सुरभि महोत्सवाचे आयोजक डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें