कु.किरण जाधव.शिर्डी प्रतिनिधी.
कोपरगाव नगरपालिकेने शहरात कचरा संकलनासाठी नव्याने ८ घंटा गाड्या तर १ नवीन जेसीबी मशीन शहराच्या विकास कामाकरिता आणल्या आहे.मात्र ही वाहने परवाना लवकर मिळत नसल्याने पालिकेच्या आवारात धूळ खात पडलेल्या अवस्थेत पडल्या पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर ही धुळीने माखलेली वाहने असतांना देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना ही वाहने स्वच्छ करण्याचा विसर पडलयाचे दिसून आल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवार दिनांक १३ डिसेंबर २०१८ रोजी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी आज सकाळी ११ वाजता कोपरगाव नगरपालिकेच्या नव्याने आणलेल्या ८ घंटा गाडी १ जेसीबी वरील धूळ साफ करून सत्याग्रह केला त्यांच्या समवेत आदिनाथ ढाकणे,अनिल गायकवाड हे होते.त्यानंतर संजय काळे यांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली असता या नव्याने आलेल्या सर्व वाहनांच्या पासिंगचे काम राहिले असल्याकारणाने ही वाहने उभी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करून शहराच्या विकास कामासाठी तसेच आरोग्य निरोगी रहावे या करिता कचरा संकलन करण्यासाठी सुरू करण्यात येतील त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी पालिकेच्या आवारातील धुळीने माखलेली वाहने स्वच्छ केल्यानंतर काही वेळातच नगरपालिका प्रशासन खडबडून जागी होऊन ही सर्व वाहने पाण्याच्या साह्याने धुण्यास सुरवात केली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें