सिल्लोड (प्रतिनिधी) दि 17/12/2018.
ज्ञानराज माऊली संजिवन समाधी सोहळ्या निमित्त स्व.गोकुळचंद खिंवसरा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य दिव्य राज्यस्तरीय किर्तन, प्रवचन, श्रीमद् भागवत कथा महोत्सवास सुरुवात झाली आहे.
सिल्लोड शहरातील भराडी रत्त्यावरच्या संकलेचा नगर येथे (रविवार दि.१६ ते रविवार दि.२३ डिसेंबर) सलग आठवडा भर किर्तन, प्रवचन महोत्सव चालणार असून शहरासह ग्रामीण भागातील हजारो भाविकांची गर्दी उसळणार असल्याने सभोवतालचा परिसर स्वच्छतेबाबत नगरपरिषदेने तात्काळ उपाययोजना करीत तीन घंटा गाड्या खरेदी करुन परिसर स्वच्छतेबाबत संबंधित कर्मचा-यांना सुचना देण्यात आल्याचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सांगितले.
सिल्लोड येथील नगरपरिषद अंतर्गत निधी उपलब्ध करुन शहरातील काडी - कचरा जमा करण्यासाठी तीन घंटा गाड्या खरेदी करण्यात आल्या असुन घंटा गाड्यांचा लोकार्पण सोहळा शहरातील भराडी चौक येथे संपन्न झाला.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते तीन घंटा गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, शंकरराव खांडवे,रईस मुजावर पठाण, विठ्ठलराव सपकाळ,कैसर आझाद,मनोज झंवर, राजु गौर, गणेश डकले,कुणाल सहारे,सलिम हुसैन,मतीन देशमुख,मधुकर बेंडाळे, अकिल देशमुख, जुम्माखा पठाण,अमित आरके,अफजल बेग, अब्दुल बासित,फईम पठाण,आदिंसह पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें