सेलू प्रतिनिधी.
सेलू (30) श्रीराम प्रतिष्ठान आयोजित पाच दिवशीय सुरभी महोत्सवाची सांगता आज अपूर्वा तंत्रनिकेतन, डॉ.राम रोडगे डी.एड व बी.एड प्रस्तुत जल्लोष तरुणाईचा व चटकदार पदार्थाची मेजवानी आनंद मेळावा या बहारदार कार्यक्रमांनी झाली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सौ.सविताताई रोडगे,उदघाटक मा.सौ.रोहिणीताई राजूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ.शोभा कोरडे ,मा.सौ.कांचन बाहेती,मा.सौ.कीर्ती बिनायके,मा.सौ अशा कासट तर श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ.संजय रोडगे, मा.डॉ.आदित्य भैया रोडगे,मा. डॉ.रामरावजी रोडगे,प्रशासकिय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्राचार्य अशोक बोडखे ,प्राचार्या रत्नपारखी मॅडम,मा.घनसावंत सर प्रा.गजानन जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या उदघाटनपर भाषणात मा. सौ रोहिणीताई राजूरकर यांनी श्रीराम प्रतिष्ठान विद्या विहार संकुल मधील दिमाखात डुलत असलेल्या शैक्षणिक वातावरणाचे तोंड भरून कौतुक केले.तर मा डॉ.संजय रोडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना जगात उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक साधन सामुग्री ,शिक्षण पद्धती व इतर शैक्षणिक सुविधा सेलू व परिसरातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मिळवून देण्यासाठी अहोरात्र या पुढेहि सतत धडपडत राहणार असल्याची हमी दिली.
या कार्यक्रमात एकास सरस एक जुने व नव्या गीतांवर नृत्य व गीते सादर करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अपूर्वा तंत्रनिकेतनमधील व डॉ.राम रोडगे डी.एड व बी.एड महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.प्रा.अन्सारी हादी व प्रा.पूनम पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.सचिन निर्वळ यांनी आभार प्रदर्शन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें