सेलू प्रतिनिधी.
सेलूचे तहसीलदार आसाराम छडीदार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला असून विभागीय आयुक्तांनी या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पत्र परभणीच्या जिल्हाधिकारी मिळाले आहे. विशेष म्हणजे आसाराम छडीदार हे येत्या 31 डिसेंम्बर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यापूर्वी त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
नेमका घोटाळा काय ?
तहसीलदार आसाराम छडीदार यांनी तहसील कार्यालयाच्याच एका कर्मचाऱ्याला कागदोपत्री कंत्राटी कर्मचारी असल्याचं दाखवलं. या कर्मचाऱ्याला जवळपास एक लाख रुपयांचा निधी दिला. हा निवडणुकीसाठीचा निधी होता आणि त्यात गैरप्रकार झाल्याची तक्रार दिलीप डासाळकर नावाच्या पत्रकाराने केली होती. या आरोपांनंतर सेलूच्या सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी या घोटाळ्यासंदर्भातील त्यांचा अहवाल परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. या अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी छडीदार यांना पाठीशी घालण्यासाठी थातूरमातूर कारवाई केल्याचा आरोप डासाळकर यांनी केला होता. याबाबत त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहून फेरचौकशीची मागणी केली होती. यामुळे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुन्हा एकदा चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें