सेलूत मुख्य व्यवस्थापकांनी हुलकावणी दिल्याने प्रवासी संतप्त. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 13 दिसंबर 2018

सेलूत मुख्य व्यवस्थापकांनी हुलकावणी दिल्याने प्रवासी संतप्त.

रेल्वे विभागीय व्यवस्थापक  सेलूकरात शाब्दिक चकमक.

 पंधरा डब्यांची जी.एम.९ स्पेशल मिनिट रोखली.


सेलू:प्रतिनिधी शमशेर खान

 दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार यादव लासूर स्टेशनला भेट देऊन परभणी कडे जात असताना सेलू येथील प्रवासी संघटनेच्या आग्रहाखातर भेट देणार होते.म्हणून त्यांच्या स्वागतासाठी प्रवासी संघटनेसह शहरातील सर्व राजकीय व सामाजिक आणि  प्रवासी रेल्वे  स्थानावर आले होते. मात्र पंधरा डब्यांची जी.एम.स्पेशल एक्सप्रेस बुधवार दि.१२  डिसेंबर रोजी दुपारी ४-३५ वाजता सेलू रेल्वे स्थानकावर येऊन उभी राहिली. रेल्वेच्या सर्वात पाठीमागच्या कोच मध्ये असणारे मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सेलूकरांशी संवाद टाळून सेलूकरांना हुलकावणी दिली. दरम्यान नांदेड येथील विभागीय व्यवस्थापक त्रीकाल रा.भा. यांनी सेलूकरा समोर येऊन मुख्य व्यवस्थापक विनोदकुमार यादव हे आजारी असल्याचे सांगितले आणि शाब्दिक संघर्षाची सुरुवात झाली. सेलू येथील प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व राजकीय पदाधिकारी यांनी मुख्य व्यवस्थापकांना बोलवा व आमच्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचू द्या असा आग्रह धरला. त्यावेळी विभागीय व्यवस्थापक त्रिकाल रा.भा. यांनी तुमच्या मागण्या  आमच्या पातळीवर सोडवल्या जात नाहीत त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष रेल्वेमंत्र्यांकडे जा असा सल्ला दिला त्यावेळी उपस्थित सेलूकरांनी किमान आमच्या मागण्या ऐकून तरी घ्या  असे म्हणत  मुख्य  व्यवस्थापकांना भेटण्यासाठी आग्रह  धरला तरी देखील विभागीय व्यवस्थापकांनी सेलूकरांचे आग्रहाला न जुमानता संतप्त सेलकरांचे करायचे उग्ररूप पाहून डब्यात बसवून जी.एम. स्पेशल गाडीला हिरवा सिग्नल दिला. त्यावेळी उपस्थित सेलूकरांनी वेळ देऊन देखील भेट न दिल्यामुळे मुख्य व्यवस्थापक व रेल्वे प्रशासनाचा निषेध केला. एवढेच नव्हे तर निषेधाच्या घोषणा दिल्या.शेवटी ४:४४ वाजता या म्हणजेच ९ मिनिटांनी उशिरा जी.एम. एक्सप्रेस सेलू रेल्वे स्थानक सोडले.

 ■सफाई कामगारांने  केले आसनाचे लोकार्पण

सेलू रेल्वे स्थानकावर  लोकवर्गणीतून १९ बेंच आसनव्यवस्थे साठी  उभारली आहेत या लोक वर्गणीतून उभारण्यात आलेल्या आसन व्यवस्थेचे लोकार्पण मुख्य व्यवस्थापक यांच्या हस्ते करण्याचा सेलकरांचा आग्रह होता. मात्र जी.एम. स्पेशल गाडीतून मुख्य व्यवस्थापक बाहेर आलेच नाही. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी स्टेशन वरील सफाई काम करणा-या  शाहू काळे व सोनाबाई हिवाळे यांच्या हस्ते आसन व्यवस्थेचे लोकार्पण केले.
■  सेलूकरांची २ रेल्वे थांबविण्याची मुख्य मागणी.

  सेलूकर मुख्य व्यवस्थापक यांच्याकडे दोन प्रमुख मागण्या करणार होते.  यात नांदेड- अमृतसर सचखंड एक्सप्रेस व नगरसोल -नरसापुर एक्सप्रेस या दोन गाड्यांना सेलू येथे थांबा देण्यात यावा तर आठवड्यातून दोन वेळा असणारी नांदेड. पुणे एक्सप्रेस ही गाडी नियमित करण्यात यावी या मागणीसाठी सेलूकरांचा मुख्य व्यवस्थापकांना भेटण्यासाठी चा आग्रह होता. त्याऐवजी विभागीय व्यवस्थापकांनी सेलूकरांची भेट घेऊन तुमच्या मागण्या रेल्वे मंत्री मंजूर करू शकतात असे म्हणत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भेटण्याचा सल्ला दिला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें