120 विद्यार्थ्यांना देण्यात आली लस.
शेख सलिम
भोकरदन प्रतिनिधी :
गोवर आजाराला हद्दपार करण्यासाठी आणि रुबेला आजारावर नियंत्रण आणण्यासाठी राज्यभरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. त्याअनुषंगाने संस्थेचे सचिव विलास काळे यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सुमारे 120 विद्यार्थ्यांना लस देण्यात आली व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
साधारणत: दीड महिना चालणाऱ्या या लसीकरण मोहिमेत नऊ महिने ते 15 वर्ष वयोगटातील बालकांना शासकीय, खासगी शाळा, अंगणवाडी आणि शाळाबाह्य बालकांना गोवर, रुबेला लस विनामुल्य देण्यात येणार आहे. या लसीकरणाचा सर्व पालकांनी बालकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन श्रीमती सीमा मोहिते यांनी यावेळी केले.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा या गावांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र हद्दीतील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल मधून या लसीकरण मोहिमेला जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्यविभाग नियंत्रक डॉ. सीमा मोहिते, आरोग्य सहाय्यक बी.एस.बेडवाल यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली. आरोग्य विभागाच्या चमूच्यावतीने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल मध्ये लसीकरण करण्यात आले.
लसीकरण शुभारंभ कार्यक्रमास आरोग्य सेवक के.एम.शिंदे, आरोग्य सेविका श्रीमती काळे, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक नितीन ठोंबरे, संस्थेचे उपाध्यक्ष बालासाहेब करतारे, व्यवस्थापक गणेश सोळुंके आदींची उपस्थिती होती.
शाळेतील सहशिक्षिका दया पवार, सोनाली ठोंबरे, सरिता काळे, तृप्ती अग्रवाल, सौ.टी.एस.आडे, सौ.सुवर्णा गणेश सोळुंके यांनी विद्यालयात लसीकरण मोहीम व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी निळकंठ ठोंबरे, रमेश पंडित, गणेश गव्हाणे, पंडित जाधव, कृष्णा जाधव, गंगाधर जोशी, जनार्धन ठोंबरे, दत्ता हिवाळे, धनराज बसैये, विलास काळे, अरुण घोलप, विष्णू बकाल, गजानन शेळके, कारभारी घोलप, संतू घोलप, विष्णू जाधव, गजानन जाधव, राजू घुसळकर, शिवाजी मुरकुटे, शिवाजी धासाल यांच्यासह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें