अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 1 दिसंबर 2018

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन.



अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.

जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांच्या निधनाने अमेरिकेने एक मोठा राजकीय नेता गमावला आहे. जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे अमेरिकेचे 41वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी 1989 ते 1993 या काळात राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. राष्ट्राध्यक्ष होण्याआधी त्यांच्याकडे आठ वर्षे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी होती. तसेच, शीतयुद्ध संपुष्टात आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती.
याचबरोबर, अमेरिकेचे 43 वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांचे जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश हे वडील होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें