प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरपरिषद सेलू चे नगरी सुविधांचा अभाव . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 25 दिसंबर 2018

प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरपरिषद सेलू चे नगरी सुविधांचा अभाव .

सेलू भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष लालू खान यांची मागणी.

तेज़्ज़न्युज़24 प्रतिनिधी.सेलु.


सेलू येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगरपरिषद चे विकास कामे रखडली आहे या प्रभागात गुलमोहर कॉलनी आयेशा कॉलनी राजीव गांधी नगर अजिंठा कॉलनी असा मोठा भाग या प्रभागात येतो गुलमोहर कॉलनी सेलू तील प्रतिष्ठित नागरिकांची कॉलनी आहे तरी या कॉलनीत नालीचे बांधकाम झाले नाही नालीचे पाणी रस्त्यावर येत आहे येणार्‍या-जाणार्‍या लोकांना फार त्रास सहन करावा लागत आहे रस्त्यावर सांडपाणी जमा होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईला आमंत्रण मिळत आहे राजीव गांधी नगर आयेशा कॉलनी अजिंठा कॉलनी या भागात रस्ते वीज पाणी पिण्याचे पाणी आधी कुठल्याही प्रकारची सुविधा नगरपरिषद उपलब्ध करून दिले नाही या प्रभागातील  नगरसेवक  फक्त आश्वासन  देत आहे संपूर्ण परिसर शहराच्या विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे शौचालय अंतर्गत नगर परिषद सेलू कडे जमा रक्कम तात्काळ नागरिकांच्या खात्यावर जमा करावी जेणेकरून शौचालय बांधकाम करणे सुलभ होईल नगराध्यक्ष यांनी जातीने या प्रभागात लक्ष द्यावे अशी मागणी सोमवारी दिनांक २४ .१२.२०१८ ला मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे सेलू भाजपा अल्पसंख्यांक शहराध्यक्ष लालू खान यांनी दिली आहे व काम न झाल्यास नाईलाजाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदन द्वारे दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें