योग्य नियोजनामुळे मुबलक पाण्याची उपलब्धता - आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 6 दिसंबर 2018

योग्य नियोजनामुळे मुबलक पाण्याची उपलब्धता - आ.अब्दुल सत्तार;

टिळक नगर परिसरातील महिलांनी व्यक्त केले आ.अब्दुल सत्तार यांचे आभार ;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि.06/12/2018.
दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे परंतू सिल्लोड शहरासाठी योग्य नियोजन करण्यात येत असल्याने अगदी भीषण पाणी टंचाई मध्ये देखील सिल्लोड शहरातील नागरिकांना भरपूर पाणी मिळत आहे. दुरदृष्टी विचारातून खेळणा मध्यम प्रकल्पात चर खोदूण पाणी टंचाईवर मात करण्यात सिल्लोड नगरपरिषद यशस्वी ठरली आहे. एकंदरीतच पाण्याच्या योग्य नियोजनामुळे सिल्लोड शहरवासियांची तहान भागविली जात असल्याचे मत माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले.

सिल्लोड शहरातील टिळक नगर येथील नागरिकांच्या दारोदार जाऊन विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत घरकुल - रस्ते - पाणी - वीज या मुलभूत सुविधांसह व इतर अनेक समस्यांचे निवारण करण्यात आले. ठिक ठिकाणी माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांचे नागरिकांनी स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे, देविदास पाटील लोखंडे,रमेश पाटील साळवे,महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड,विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान,कैसर आझाद, सत्तार हुसैन,सतीश ताठे,सलिम हुसैन, कुणाल सहारे,संजय फरकाडे,संजय आरके, निजाम पठाण, राजरत्न निकम,राजु गौर,अकिल देशमुख,संजय मुरकुटे, मतीन देशमुख, मधुकर बेंडाळे,मुश्ताक देशमुख, मनोज झंवर,हाजी मोहम्मद हनिफ,दशरथ खोडके, अक्षय मगर, मनोहर आरके,राजेश्वर आरके,जुम्माखा पठाण,अफजल बेग,गणेश डकले,योगेश सनान्से, रवि आरके,सुनिल इंगळे,माणसिंग राजपूत,शैलेश गौर,जिवन सोनवणे, जगन्नाथ कुदळ,फईम पठाण,भावराव दुधे,जितू आरके,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
टिळक नगर परिसरातील महिलांना पाणी टंचाई समस्या बाबत विचारना केली असता भरपुर पाणी मिळत असल्याचे सांगुन योग्य नियोजनामुळे आ.अब्दुल सत्तार यांचे योग्य पाणी टंचाई प्रश्नावर मात केल्याबद्दल आभारही व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें