मानवत तालुक्यातील युवकांनी नोकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा- डॉ.जगदिश शिंदे - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 19 दिसंबर 2018

मानवत तालुक्यातील युवकांनी नोकरी मेळाव्याचा लाभ घ्यावा- डॉ.जगदिश शिंदे


तेज़्ज़न्युज़24 प्रतिनिधी.मानवत/ मुस्तखिम बेलदार
दि.१९: ओंकार सेवाभावी संस्था पाथरीच्या वतीने युवकासाठि भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे दि.२३ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे या मेळाव्यात मानवत तालुक्यातील सुशीक्षित  बेरोजगार युवकांनी व युवतीनी मोठ्यासंख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहान ओंकार सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष डॉ.जगदिश शिंदे यांनी केले आहे.
संत साईबाबा यांच्या जन्मभुमी आसलेल्या पाथरी शहरात नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यात मानवत,पाथरी,सेलु,सोनपेठ ,माजलगाव ,परभणी या भागातील सुशीक्षित तसेच अल्पशिक्षित  युवक युवतीसाठी रोजगार मिळण्याची सुवर्ण संधी आहे ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळावे व आर्थीक मागासलेपण दुर व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सध्या दुष्काळी परिस्थीचे सावट असुन यामुळे या माध्यमातून बेरोजगारी दुर होण्यास मदत होईल या नोकरी महामेळाव्यात ३० पेक्षा जास्त कंपनी येणार आहेत आवश्यक पाञता धारक तरुणांना मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठीचे अॉफर लेटर हे जागेवरच मिळणार आहे .तरी जास्तीत जास्त युवक युवतीनी नोदणीसाठी हॉटेल सिटि प्राईड बसस्थानकच्या पाठीमागे पाथरी मो.९८९०३०५०९७-९५४५५३५३५३ या नंबवर संपर्क साधण्याचे आवाहान ओंकार सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष डॉ.जगदिश शिंदे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें