मानवत तालुक्यातील वाळु धक्के सुरु करण्याची राष्टृवादि कॉग्रेस पक्षाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 18 दिसंबर 2018

मानवत तालुक्यातील वाळु धक्के सुरु करण्याची राष्टृवादि कॉग्रेस पक्षाची मागणी.




मानवत/ मुस्तखीम बेलदार.
दि.१८ : मानवत तालुक्यात सध्या वाळु बंद असुन नवीन लिलाव वाळुचा होण्यास वेळ लागत असल्यामुळे बांधकामे बंद पडली असुन त्याचा थेट परिणाम बांधकाम मजुरावर पडत आहे  त्यांमुळे राष्टृवादि कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोईन अन्सारी यांनी आज दि.१८ डिसेंबर रोजी तहसिलदार यांना निवेदन देऊन वाळुधक्के सुरु करण्याची मागणी केली आहे.
मानवत तालुक्यात बांधकामकामगार मोठ्याप्रमाणात असुन ४ महिण्यापासुन वाळु बंद असल्यामुळे मजुरी करणाऱ्या बांधकामकामगारा वर उपासमारीची वेळ आली असुन लवकरात लवकर मानवत तालुक्यातील वाळु धक्के सुरु करुन बांधकामगारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा अन्यथा लोकशाहि मार्गाने आंदोलन करण्याचा ईशारा  राष्टृवादि कॉग्रेस पक्षाच्या वतीने  निवेदनाद्वारे तहसिलदार डि.डि.फुफाटे यांना देण्यात आला आहे . यावेळी उपजिल्हाधिकारी कोळी व नायबतहसिलदार नकुल वाघुंडे उपस्थीत होते.निवेदनावर  मानवत राष्टृवादि कॉग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोईन अन्सारी ,बळीराम माने,शेख आफरोज ,शेख जुबेर,ईलीयास बेलदार,पाशा पटेल,शेख सादेक,अब्दुल करीमसह शेकडो मजुराच्यां स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें