देशी दारूला बेकायदेशीर ना हरकत देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर होणार कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 22 दिसंबर 2018

देशी दारूला बेकायदेशीर ना हरकत देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर होणार कारवाई.


सोनपेठ : प्रतिनिधी.
सोनपेठ शहरात  मध्यवस्तीत असणाऱ्या गणेश नगर भागात देशी दारूच्या दुकानाला पदाचा गैरवापर करून नाहरकत प्रमाणपत्र देणाऱ्या नगर पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर कारवाई होणार असल्याची माहीती कळत आहे.
सोनपेठ येथील अत्यंत गजबजलेल्या व मध्यवस्तीत असणाऱ्या गणेश नगर भागात देशी दारू सारख्या व्यवसायाला मंजुरी देणाऱ्या सोनपेठ नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिका-यावर प्रशासकीय कारवाई होण्याचे संकेत दिसत आहेत. या विषयी सोनपेठ भाजपचे शहराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी 2016 मध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडे एक तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक वेळेस सोनपेठ नगर पालिकेकडे पत्रव्यवहार ही केला होता. पण त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या पत्रांना न जुमानता कुठलाही खुलासा केला नव्हता. त्यामुळे सध्याचे जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी धनंजय देशमुख यांच्या तक्रारी अर्जाची नोंद घेऊन सोनपेठ नगर पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पत्र नुकतेच दिलेले आहे. आता जिल्हाधिकारी सोनपेठ नगर पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कारवाई बाबत सोनपेठ शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें