रो.ह.योजनेची कामे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन.सोनपेठ तालुक्यातील असंख्य महिला शेतमजूरांची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 11 दिसंबर 2018

रो.ह.योजनेची कामे सुरू करण्यासाठी मुख्यमंत्र्याना निवेदन.सोनपेठ तालुक्यातील असंख्य महिला शेतमजूरांची मागणी.



सोनपेठ (प्रतिनिधी) दि.११डिसेंबर २०१८.

सबंध महाराष्ट्रात यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. सोनपेठ तालुक्यातही अशीच वाईट परिस्थिती आहे. तालूक्यातील सर्वच नद्या कोरड्या पडलेल्या असून लवकरच विहीरीही तळगाठतील. त्यामुळे शेतकरी बांधवाना नापिकीला तोंड द्यावे लागनार आहे. अशा परिस्थितीत शेतमालकांना मजुरांना काम देणे अशक्य झाले आहे. रोजंदारीचा प्रश्नही भेडसावत आहे, परिणामी या शेतमजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. या दुष्काळी परिस्थितीत शेतमजूर व महिलांकडे शेती कामाशिवाय दुसरे कसलेही कौशल्य नाही. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी शेतमजूर महिलांना त्वरीत रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा.तहसीलदार सोनपेठ यांच्या मार्फत देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती मा.महसूलमंत्री मुंबई, मा.पालकमंत्री परभणी, मा.आमदार पाथरी, मा.जिल्हाधिकारी परभणी यांनाही देण्यात आले आहे. यावेळी तहसीलचे राठोड यांनी निवेदनाची प्रत स्वीकारली.
निवेदनावर गणेशनगर, संभाजीनगर, सोनपेठ शहर व तालूक्यातील शेकडो महिला शेतमजूरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन सादर करतेवेळी ज्येष्ठ नेते पांडुरंग तात्या कदम, सीतारामजी खेडकर, भगवानराव रुपनर  यांच्यासह सोनपेठ शहर व तालुक्यातील शेकडो महिला, पुरूषांचा सहभाग होता.
दिलेल्या निवेदनावर वेळीच उपाययोजना न झाल्यास निवेदनकर्ते उपोषणाची तयारी करतील अशी चर्चा आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें