नूतन विद्यालय शैक्षणिक सहलीत उदयपूर येथे मा. शिक्षण व क्रीडा मंत्र्यांना भेट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

नूतन विद्यालय शैक्षणिक सहलीत उदयपूर येथे मा. शिक्षण व क्रीडा मंत्र्यांना भेट.

सेलू प्रतिनिधी.
सेलू ( समशेर खान )नूतन विद्यालयाची सहल स्टॅच्यू ऑफ युनिटी माउंट आबू भ्रमण करून उदयपूर येथे .दि. 30 रोजी  शिक्षण व क्रीडा मंत्री मा.गुलाबचंद कटारिया यांची भेट नूतन विद्यालयातील सहलीतील विद्यार्थ्यांनी घेतली. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे वेगवेगळे प्रश्न मांडली. आणि माजी मंत्री यांनी सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. रोहित बोरगावकर, अभिजित पावडे,लक्ष्मीकांत देशपांडे, श्रावणी गोरे, श्रेया मुळे,  या विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मा.मंत्री म्हणाले  नूतन विद्यालय शिक्षण संस्था स्वातंत्र्य पुर्व काळातील शैक्षणिक संस्था असल्यामुळेच शैक्षणिक व क्रीडा प्रगती उत्तम आहे,विद्यार्थ्यांनी गुणवत्ता पुर्वक प्रश्न विचारले.  भाजप सरकार ने शैक्षणिक ,क्रीडा क्षेत्रात उत्तम प्रगती केली  सांगितले.सहल हा उपक्रम प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे व पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
अनंतकुमार विश्वंभर यांनी मंत्र्याची ओळख करून परीचय करून दिला.  रघुनाथ सोन्नेकर यांनी संस्थेची माहिती दिली. आभार प्रदर्शन गणेश माळवे तर विरेश कडगे, सौ.अनुजा सुभेदार, शुंभागी गांजापूर व 60 मुले मुली सहभागी होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें