पाथरी/प्रतीनिधी नदीम तांबोळी.दि.30/12/2018.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा पाथरीची नुतन कार्यकारनी जाहिर करण्यात आली आसुन अध्यक्षस्थानी दै.जगमित्र चे ता.प्रतीनिधी आवडाजी ढवळे तर उपाध्यक्ष पदी आयुब खान.यांची बिनविरोध निवड जाहीर
सविस्तर वृत असे कि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ता.शाखा पाथरीचा कार्यकाळ पुर्ण झाल्या मुळे नुतन कार्यकारनी निवड करण्यासाठी मावळते अध्यक्ष पत्रकार पाशा बेग यांच्या अध्यक्षतेखाली दि.३०/१२/२०१८ रोजी शासकिय विश्राम गृह पाथरी येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकी मध्ये मावळते अध्यक्ष पत्रकार पाशा बेग यांचा विशेष सत्कार करुन त्याना निरोप देण्यात आला. व त्या नंतर नविन कार्यकारनी निवड करण्याची प्रक्रिर्या सुरु करण्यात आली .या मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ता.अध्यक्षपदी दै.जगमित्र चे ता.प्रतीनीधी आवडाजी ढवळे यांची एक मताने निवड करण्यात आली तर कार्यअध्यक्षपदी दै.गाववालाचे ता.प्रतीनिधी स्वप्नील ब्रम्हराक्षे,उपाअध्यक्ष दै.अनंद नगरीचे पत्रकार आयुब खाँन,सचिवपदी दै.लोकमत समाचार चे पत्रकार नागनाथ कदम,सहसचिवपदी पत्रकार लक्ष्मन उजगरे,सरचिटनिसपदी दै.उद्याचा मराठवाडा चे पत्रकार गणेश जत्ती,कोषाअध्यक्षपदी दै.देशोन्नितीचे पत्रकार शे.शिकंदर शे.हफीज तर संघटकपदी दै.जंगचे पत्रकार स.अहेमद स.अली यांची निवड करण्यात आली याच बैठकी मध्ये असा ठराव पास करण्यात आला कि माजी अध्यक्ष पत्रकार पाशा बेग,माजी अध्यक्ष पत्रकार राजकुमार गायकवाड,माजी अध्यक्ष पत्रकार राजकुमार कांबळे तर दै.सामनाचे जेष्ट पत्रकार शामराव रणेर यांचा अनुभव संघटने साठी महत्वाचा असल्या मुळे त्यांची मुख्यसंघटक म्हणुन एक मताने नेमनुक करण्यात येत आहे तर सदस्य म्हणुन पत्रकार गोविंद गोंगे,पत्रकार विठ्ठल निसरगंघ,पत्रकार हफिस बागवान,शे.पत्रकार अझर शे.रफीक,पत्रकार शे.नदिम शे.रशिद (तांबोळी),पत्रकार बाबासाहेब सहजराव आदींची निवड करण्यात आली असुन नविन सदस्यांची लवकरच नोंदनी अभियान सुरु करण्यात येनार आहे असे नवनियुक्त अध्यक्ष आवडाजी ढवळे यांनी जाहिर केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें