बोरकिनी ग्रा. प. च्या सरपंचाचे पद रद्द.मुदतीत जात प्रमाणपत्र न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 30 दिसंबर 2018

बोरकिनी ग्रा. प. च्या सरपंचाचे पद रद्द.मुदतीत जात प्रमाणपत्र न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई.


सेलू .प्रतिनिधी.शमशेर खान.दि.30/12/2018.

सेलू तालुक्यातील बोरकिनी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी मुदतीत जात वैद्यता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे सरपंच पद रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी शिव शंकर यांनी 20 डिसेंबर रोजी दिला आहे बोरकिनी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक ऑक्टोंबर 2017 रोजी पार पडली होती. शोभा लक्ष्मण धोंडे या अनुसूचित जाती प्रवर्गातून सरपंच म्हणून जनतेतून निवडून आल्या होत्या त्यामुळे वर्षभराच्या आत जात वैधता प्रमाणपत्र तहसील कार्यालयात दाखल करणे गरजेचे होते मात्र ढोले यांनी केल्याने याविरोधात संदीप भगवान घुगे यांनी 31 ऑक्टोंबर 2018 सदस्यत्व रद करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे अपील दाखल केली होती या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी सूनावणी घेऊन दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन मुदतीच्या आत ढोले यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल करणे गरजेचे असतांना शासनाच्या अध्यादेशा प्रमाणे मी सप्टेंबर 2018 पर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यास मा सर्वोच न्यायालयाचा 23 ऑगस्ट 2018 रोजीचा निर्णय आणि 11 ऑक्टोंबर रोजी चा अध्यादेश विचारात घेऊन अर्जदार संदीप घुगे यांचा अर्ज मंजूर करत सरपंच शोभा ढोले यांना सरपंच सदस्यत्व म्हणून अनह ठरवत असल्याचा निकाल 20 डिसेंबर रोजी दिला आहे त्यामुळे 14 महिन्यातच सरपंच ढोले यांना पायउतार होण्याची वेळ आली आहे अर्जदार यांच्या वतीने ऑड आर पी सराफ तर सरपंच घुगे यांच्यावतीने ऑड डी एम भोसले यांनी काम पाहिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें