शिर्डी प्रतिनिधी,(राजेंद्र दुनबळे) शिर्डी मध्ये
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महाअधिवेशन लवकरच घेण्यात येणार असुन, या निमित्ताने शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक नुकतीच संपन्न झाली.
संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांच्या आदेशाने पत्रकार संघाचे राज्य कार्य अध्यक्ष रामनाथ जर्हाड यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेषणाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
यामध्ये सन्मानणीय मान्यवरांची माहीती,स्थानीक व परीसरातील लोक प्रतिनिधी ची नावे तसेच राजकीय, सामाजिक व शैक्षणिक व्यक्तींना देण्यात येणार्या पुरस्कारा बाबत चर्चाकरण्यात आली
पत्रकारांना राहण्यासाठी निवास व्यवस्था याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.
या अधिवेशनाची जबाबदारी महीला पत्रकारांनी स्विकारली असुन, या महा अधिवेशनास केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री, स्थानिक लोक प्रतिनिधी सह सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हे अधिवेशन जानेवारी महिन्यात होणार असल्याचे रामनाथ जर्हाड यांनी सांगितले.
सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सचिव राजेंद्र बनकर, उत्तर महाराष्ट्र उपआद्यक्ष,राजेंद्र दुनबळे ,राज्य संपर्क प्रमुख साईप्रसाद कूंभकर्ण,सचिव गणेश खेमनर,राज्य संघटक सचिन उपाध्ये,सोनवणे ताई, कु.किरण जाधव,कु.ऐश्वर्यो तासकर, राहींज ताई, शितल खर्डे, रोशन मंडलीक,कुणाल जमदाडे,गणेश भालेराव यासह विविध शिर्डी कोपरगाव,राहाता, श्रीरामपूर,
शनिशिंगणापूर,आश्वी,श्रीगोंदा, तालुक्यातील मान्यवर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें