सेलू(प्रतिनिधी)दि 07/12/2018.
शमशेर खान
अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आज शुक्रवार पासून सुरू झाल्या आहेत.एन दुष्काळात होणारी ही लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर शिवसेनेचे जी.प.गटनेते तेथे जिंतूर सेलू विधानसभाप्रमुख राम पाटील यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत " कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? "असा प्रतिप्रश्न भा.ज.प.व राष्ट्रवादीला विचारला आहे.तसेच एकीकडे शिवसेना शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करीत असतांना विविध पक्षांकडून लाखोंची उधळपट्टी एन दुष्काळात होणे योग्य नसल्याचे मत देखील राम पाटील यांनी व्यक्त केले.
आज सेलू मध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे भव्य उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्त भव्य रैली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून काढण्यात आली.एन दुष्काळ असतांना फटाक्यांची आतिषबाजी,बँड मोठमोठी डिजीटल बॅनर,तसेच रसतयाचे दुतर्फा पक्षाचे झेंडे लावुन वाहतुकीस अडचण रैली मध्ये खर्चही भरपूर करण्यात आला.सर्व रस्त्यावर व ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या.सध्या सर्व महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असतांना आशा प्रकारे पैशांची उधळपट्टी होत असताना शेतकऱ्यांना काय वाटेल? याकडे तरी लक्ष असायला हवे.माझा शेतकरी बांधव जनावरांच्या चाऱ्यासाठी,पिण्याच्या पाण्यासाठी हैराण आहे.असंख्य शेतकऱ्यांच्या पेरण्याही नाहीत.दुष्काळी परिस्थिती पाहणी करण्यासाठी आलेले पथक केवळ धावत दौरा करून शेतकऱ्यांचंय जखमेवर एकप्रकारे मीठ चोळून गेले आहे.ङ.
शिवसेना ही शेतकरी हैराण असल्याने सर्वत्र दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांसोबत आहे.लोअर दुधना धरणातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावतें,पालकमंत्री गुलाबराव पाटील,शिवसेना खा.बंडू जाधव,आ.राहुल पाटील यांनी जोरदार पाठपुरावा केल्यानंतर पाणी सोडण्यात आले.शिवसेनेच्याच हिसक्यानंतर लोअर दुधना धरणातून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले.आज पाणी सोडल्याने शेतकरी सुखावला असून चाऱ्याचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे.आजच मुंबईत प्रकाशगड येथे शिवसेना खा.संजय जाधव यांचया नेतृत्वाखाली घेराव घातल्यानंतर तातडीने उद्याच 50 नवीन ट्रान्सफॉर्मर शिवसेनेनं परभणी जिल्ह्यासाठी मंजूर करून घेतले आहेत.तसेच जिल्ह्यातील बिघडलेल्या सर्वच ट्रान्सफॉर्मर साठी 10 हजार लिटर ऑइल मंजूर करून घेतले असून तातडीने सर्व बिघडलेले ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करण्यात येणार आहे असेही गटनेते राम पाटील यांनी सांगितले.
शिवसेना शेतकऱ्यांसाठी जीवाचे रान करीत असताना हे पक्ष मात्र क्रिकेट व कबड्डी सामने घेऊन लाखो रुपयांची उधळपट्टी आहेत हे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही राम पाटील यांनी विचारला आहे.एकंदरीत एन दुष्काळात सेलूत भव्य कबड्डी स्पर्धा होत आहेत याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.तसेच येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत संतापलेलज जनता व शेतकरी यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असेही राम पाटील यांनी सांगितले
शाळांचा काय संबंध?कबड्डी स्पर्धा या मोठया गटाच्या मुलांच्या आहेत.यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा संबंध काय? असेही राम पाटील यांनी सांगितले.शाळकरी विद्यार्थ्यांना या रैली मध्ये विविध देखावे करून शाळकरी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले होते.देखावा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत केली असणार.दिवसभर शाळा करून दुपारनंतर पुन्हा सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना केवळ प्रसिद्धीसाठी सहभागी करून घेणे योग्य आहे का? यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची खरच गरज होती का? असेही राम पाटील यांनी सांगितले.

साहेब स्पोर्ट्स मधील एक गुनवंत मुलांची ओळख बाहेर येत आहे त्यातून दुष्काळ स्पोर्ट्स मेंळ नका घालु
जवाब देंहटाएं