उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन.
शेख सलिम.भोकरदन प्रतिनिधी : अयोध्या येथील बाबरी मशीद उध्वस्त करणार्या आरोपीवर कठोर कारवाई करून बाबरी मशीद त्याच ठिकाणी पूर्न निर्माण करावे या मागण्याचे निवेदन आज दिनांक ६ डिसेंबर रोजी भोकरदन उपविभागीय अधिकारी यांना भोकरदन काँग्रेस अल्पसंख्याक सेल येथील मुस्लीम बांधवाच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात नमुद केले आहे की ६ डिसेंबर १९९२ रोजी आयोध्या येथे काही देशद्रोही लोकांनी नियमाचे उल्लंघन करून बाबरी मशीद पाडली यामुळे देशातील हजारो मुस्लिम समाजाचे मन दुखावले आहे बाबरी मशिद पाळणाऱ्यावर आजपर्यंत काही कारवाई झाली नाही यामुळे या आरोपीवर कडक कारवाई करून बाबरी मशिद त्याच जागेवर बाधण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी माजी .नगराध्यक्ष नजीर भाई , ता.सचिव झहीर भाई,ता.अल्पसंख्याक अध्यक्ष मो शाहरूख,सत्तर सेठ,मो.नासेर,मोहम्मद हुसेन अमोदी, रईस भाई, मो.नसीम,शेख अन्सार,नसीम कुरेशी,रिझवान शेख,मो.आमेर,सईद पठाण,अझर खान,शेख अमीन निवेदनावर आदींच्या सह्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें