नागरिकांच्या विविध समस्यांचा तात्काळ निपटारा करण्याची गरज - आ.अब्दुल सत्तार; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 दिसंबर 2018

नागरिकांच्या विविध समस्यांचा तात्काळ निपटारा करण्याची गरज - आ.अब्दुल सत्तार;

आमदार आपल्या दारी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद;

सिल्लोड (प्रतिनिधी)दि 14
सिल्लोड शहरातील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत जागेवरच समस्यांचा निपटारा करण्यात येत असल्याने नागरिकांमधुन आमदार आपल्या दारी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड शहरातील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी 01 डिसेंबर पासुन आमदार आपल्या दारी अभियान सुरु केले असुन शुक्रवार
(दि 14)रोजी सिल्लोड शहरातील शिवाजी नगर, समता नगर,लक्ष्मीनगर,न्यू म्हसोबा महाराज नगर,मोगलपुरा परिसरातील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत घरकुल - रस्ते - पाणी - वीज या मुलभूत सुविधांसह व इतर अनेक समस्यांचे निवारण करण्यात आले. माजीमंञी आ. अब्दुल सत्तार यांनी जागेवरच अनेक समस्यांचे निवारण केल्याने वार्डा - वार्डातील नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आमदार आपल्या दारी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . ठिक ठिकाणी माजीमंञी आ.अब्दुल सत्तार यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे,विठ्ठलराव सपकाळ, शांतीलाल अग्रवाल, रऊफ बागवान,राजु गौर,सतिश ताठे, संजय आरके, राजरत्न निकम,निजाम पठाण,मनोज झंवर,डाँ.फेरोज पटेल,संजय फरकाडे, मुश्ताक देशमुख, मतीन देशमुख,मनोज कोठाळे,अकिल देशमुख,मधुकर बेंडाळे,संजय मुरकुटे,कुणाल सहारे,अमित आरके, मनोहर आरके,राजेश्वर आरके,जितेंद्र आरके,फईम पठाण,रवि आरके,भावराव दुधे,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें