छत्तीसगडमध्ये नवे सरकार येण्यापूर्वी दोन ट्रक फायली जाळल्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 14 दिसंबर 2018

छत्तीसगडमध्ये नवे सरकार येण्यापूर्वी दोन ट्रक फायली जाळल्या.


छत्तीसगडमध्ये भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवून कॉग्रेस पक्ष सत्तेत आला आहे. मात्र नव्या सरकारची स्थापना होण्याअगोदर छत्तीसगड गुप्तचर विभागाने तब्बल दोन ट्रक फायली जाळल्याने संशयाचा धूर निघू लागला आहे. गुरुवारी रायपूरमधील अवंती विहार मैदानावर पोलीस बंदोबस्तात या फायली जाळण्यात आल्या आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजपला तीन राज्यांमध्ये सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्ष भाजपचे सरकार होते. मात्र सत्ता परिवर्तन होताच अशाप्रकारचे दोन ट्रक फायली जाळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्याच्या गुप्तचर विभागाकडे सरकारच्या गोपनीय सूचना आणि महत्त्वाचे दस्तावेज असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कागदपत्र जाळून नष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सर्व फायली जळून खाक होईपर्यंत त्या ठिकाणी पोलिसांचा खडा पहारा होता. ज्या फायली अर्धवट जळालेल्या होत्या त्या पुन्हा आगीत टाकून नष्ट केल्या जात होत्या. या प्रकरणी पोलिसांनी मात्र बाजू सावरत, फक्त रद्दी आणि उपयोगी नसलेली कागदपत्र जाळल्याचे सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें