मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या * तहसील समोर जमियते उलमाए हिंदचे धरणे आंदोलन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 23 नवंबर 2018

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या * तहसील समोर जमियते उलमाए हिंदचे धरणे आंदोलन.



विशेष प्रतिनिधी.
जिंतूर – मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या यामागणीकरिता जमियते उलमाए हिंद शाखा जिंतूरच्या वतीने शुक्रवार २३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिंतूर तहसीलदारां मार्फत निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी जमियते उलमाए हिंदचे पदाधिकारी यासह नगरसेवक स्थानिक परिसरातील मुस्लिम समाजातील धार्मिक आणि सामाजीक क्षेत्रातील विविध संघटनांच्या पदाधिकारी यांच्या सह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

स्वातंत्र्य चळवळीत  क्रियाशील योगदान देत लाखोंच्या संख्येने प्राणाची आहुती देऊन भारतास स्वातंत्र्य मिळवून देण्यास जमियते उलमाए हिंद व मुस्लीम समाजातील महापुरुषांचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लीम समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अधोगती होत समाज सर्वच क्षेत्रात मागे राहिला आणि आज समाजाची अवस्था अत्यंत केविलवाणी व बिकट झाली आहे. न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर कमिटी, न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा कमिशन तसेच महाराष्ट्र सरकार तर्फे नियुक्त केले गेलेले मेहमूदरहमान अभ्यास गटाने मुस्लीम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हलाखीच्या स्थिती देशापुढे आणली. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची आवश्यकता असल्याची अहवालात नमूद केले होते. व महाराष्ट्र राज्य शासनाने 2014 च्या निर्णयान्वये राज्यातील शासकीय, निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थामध्ये मुस्लिम समाजाचे एकूण 50 टक्के प्रवर्गाला विशेष मागास प्रवर्ग अ मध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावरून उच्च न्यायालय मुंबई यांनी मुस्लीम समाजासाठी 5 टक्के आरक्षण दिले. मात्र अध्यादेशाची मुदत संपवून ही अद्यापपर्यंत शासनाने मुस्लीम अरक्षणाकडे दुर्लक्षच केले आहे. म्हणून शिक्षणापासून वंचित पिढ्यानपिढ्या न्यायहक्क नाकारलेल्या मुस्लीम समाजास त्यांचे हक्क त्वरित मिळवून देण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा येईल असा इशारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे. शिवाय जमियते उलमाए हिंदच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले.  यावेळी तालुकाध्यक्ष  मौ तजम्मूल अहेमद खान, सिराज नदवी, नगरसेवक शेख इस्माईल, हाफेज अनिस, हाफेज रजाक, हारून लाडले, ओसामा बेग, हारून खान, शेख ईस्तेखार, अब्दुल मुखीद, सय्यद खिजर, शेख गुलजार, सय्यद रियाज, निजाम सिद्दीकी आदींची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें