मराठा सेवा संघ तर्फे मुस्लिम धरणे आंदोलनाला पाठींबा.
शेख सलिम
भोकरदन प्रतिनिधी :
मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी आज जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे मागणीसाठी आज जमियत उलेमा हिंद या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर धारणे आंदोलन करण्यात आले.व या मुस्लिम समाजाच्या धारणे आंदोलनाला संभाजी ब्रिगेड व मराठा समाजा तर्फे पाठींबा देण्यात आला. या आंदोलनात शेकडो मुस्लीम बांधवांनी हजेरी लावली. आंदोलनात शिस्त व संयम दिसला व या सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. येथील जमियत उलेमा हिंदचे अध्यक्ष हाफिज शफी यांच्या मार्गदर्शनाखाली धारणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली भूमिका मांडून सरकारी हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी केली.या न्यायमूर्ती सच्चार कमिटी व डॉ. रहेमान समितीने २०१३ मध्ये सदर केलेले व इतर गोष्टी बरोबर सरकारने आरक्षण लवकरात लवकर द्यावे अश्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी साहेब यांना पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.या आंदोलनात शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. भोकरदन येथे जमीयत उलेमा हिन्दच्या वतीने शहर व परिसरातील मुस्लिम बांधवानी मुस्लिम समाजासाठीचे हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीकरीता शांततापूर्ण मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयावर दुपारी दोन वाजता शहरातील काझी मोहल्ला मर्कस मस्जिद येथून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. या मोर्चात शहरातील मुस्लिम बांधवांनी शांततेच्या मार्गाने मोर्चात सहभाग घेतला. शहरातील तरुणांनी हातात जमीयत उलेमा हिन्दचा झेंडा व विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चाला सुरुवात केली. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकल्यावर मौलवी उलेमा यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण का मिळावे या बाबत मार्गदर्शन केले व संभाजी ब्रिगेडचे जंजाळ सर,सुरेश तळेकर यांनीपण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे व कुंभकर्णी सरकारला धारेवर धरले. उपविभागीय कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु होते. आंदोलकांन विविध आपल्या भावना शासन दरबारी कळवाव्या, अशी विनंती करण्यात आली या मोर्चात मोठ्या संख्येने मुस्लिम सह इतर समाजातील लोक शामिल झाले होते. यातील अनेकांनी मुस्लिम समाजाची मागणी रास्त असून ती शासनाने पूर्ण करावी, अशी मागणी केली. येणाऱ्या काळात ही मागणी लावून धरण्यात येणार असून सदर मागणी तातडीने मार्गी लागली नाही तर जमीयत उलेमा हिन्दतर्फे आंदोलन तिरव करण्याचा इशारा यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनात मुस्लीम समाजाला शैक्षणिक विभागात नोकऱ्यांमध्ये, व्यवसायात आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी जमीअत ए उलमाचे ता.अध्यक्ष हाफीज शफी साहेब,शहर अध्यक्ष मौलाना हरून, हाफीज नासेर, मौलाना फेरोज,हाफिज नविद,हाफिज अन्सार ,मुफ्ती खालिद,हाफिज जावेद ,शफीक सेठ,मुजीब हाजी,नजीर भाई,नसीम पठाण,कदिर बापू,संभाजी ब्रिगेडचे जंजाळ सर,मराठा सेवा संघचे सुरेश तळेकर, राजू शेळके,जफर भाई,रिझवान भाई,चंद्रकांत पगारे,शेख जावेद,जुनेद शेख,जुबेर भाई व मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम समाजबांधव हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें