महात्मा फुले सावीञीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 28 नवंबर 2018

महात्मा फुले सावीञीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी.


मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२८ : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना देशाच्या सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या मागणीचे निवेदन आज दिनांक २८  नोव्हेंबर रोजी क्रातीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १२८ व्या पुण्यतिथी निमित्त  शिव-फुले-शाहू-आंबेडकर प्रेमी नागरिक मानवत यांच्या वतीने तहसीलदार डि.डि.फुफाटे मानवत यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपती साहेब यांना निवेदन देण्यात आले .
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने शिक्षण कार्यात तसेच सामाजिक चळवळीचे मोठे योगदान दिले असून त्यांनी मुलीसाठी ची पुणे येथे पहिली शाळा सुरू करून मुलींना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिला तसेच त्यांनी शेतकऱ्यासाठी चे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चे मोठे योगदान दिले आहे सावित्रीबाई फुले यांनी मुलीच्या शिक्षणासाठी हाल-अपेष्टा सहन करून त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला अशा या फुले दाम्पत्यांना भारताच्या सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना हा मोलाचा बहुमान देण्यात यावा ही सर्व शिव फुले शाहु आंबेडकरी जनतेची मागणी आहे असे निवेदनात नमूद केले आहे .
निवेदनावर भीमराव तूपसमुद्रे, विजय खरात, भैय्यासाहेब गायकवाड ,राजाराम महिपाल, आकाश कनकुटे ,आदर्श धबडगे ,रतन ढवळे, अभिषेक रासवे ,रोहन नंदनवरे ,विशाल धबडगे, आनंद पंचांगे ,शुभम पंचांगे, विजय धबडगे, नागसेन भदर्गे, रवी पंडित ,किरण पंडित, अभय तूपसमुद्रे , विकी नितनवरे ,सागर गोड आदी  नागरिकाच्या स्वाक्षरी आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें