सेलू प्रतिनिधी.
सेलू तालुक्यातील वालूर येथील बबन उर्फ मुक्ताराम सखाराम डुमे शेतकरी सतत ची नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळुन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 27 नोव्हेंबर मंगळवार रोजी साकळी 7 वाजेपुर्वी वालूर शिवारात येथे घडली.
वालूर येथील शेतकरी बबन उर्फ मुक्ताराम सखाराम डुमे वय 60 वर्ष धंदा शेती यांनी सततच्या नापिकी.बँकेचे कर्ज कसे फेडावे व अपंग मुलाला नौकरी लागत नसल्या करणाने कंटाळुन 27 नोव्हेंबर मंगळवार रोजी सकाळी 7 वाजेपुर्वी स्वतः हा च्या शेतातील बोरीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 27 नोव्हेबंर सकाळी चार वाजत शेतात पाणी देण्या साठी चाललो म्हणुन घरातून निघून जाऊन स्वःताहाच्याच शेतात आत्महत्या केल्या ची माहिती शंकर नागनाथ डुमे यांनी दिली.पोलीस साहेबराव चवरे.बि.जी पुरणवाड.बि.के.लिंगायत.रहीम सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात हलवला . शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अंत्यसंस्कार स्वतः हा च्या शेतात करण्यात आले .त्यांच्या पश्चात पत्नी . तीन मुले,दोन सुना नातवंड असा परिवार आहे.पुढील तापस बी .एस .जमादार करीत आहे .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें