मुंबई. दि.19/11/2018. हिवाळी अधिवेशनाच्या पहील्या दिवशी मुंबईत मंत्रालयासमोर मराठा-मुस्लिम-धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी एआयएमएमच्या आमदार आक्रामक झाले.
एम आय एमचे आमदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रवेशद्वारावर मुस्लिम समाजाला शिक्षण व नोक-यामध्ये आरक्षण देण्याचे मागणीचे बँनर झळकावून मागणी केली. बँनरवर लिहले होते “हमेंभी जश्न मनानेकी तारीख बताओ”, “मिस्टर सीएम, हमे जश्न मनानेको कब मिलेगा’. मराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोश करावे या वक्तव्याने विरोधी आमदार संतप्त झाले आहेत. न्यायालयात मुस्लिम आरक्षणाचे प्रकरण असताना राज्य सरकार मराठा समाजाला खुश करण्यासाठी निर्णय घेत असल्याने मुस्लिम समाजात निराशा पसरली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे अशी मुस्लिम समाजाची भावना आहे. पण भाजपा मुस्लिम समाजाला डावलून जातीयतेचे राजकारण करीत आहे, असा संदेश या वक्तव्याने जात आहे. धनगर समाजाने पण आरक्षणासाठी अनेक आंदोलने करुन सुध्दा त्यांच्या पदरी चार वर्षात काही पडले नाही.आमदारांनी ठिय्या आंदोलन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें