भोकरदन:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. अंकुश पाटिल जाधव यांनी आ. राजेश टोपे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या उपस्थितित आज भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मध्ये जाहिर प्रवेश केला.
याविषयी माहिती अशी की,आज भोकरदन येथील माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ता मेळावा आणि दिपावली स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी माजी पालकमंत्री तथा आमदार राजेश टोपे यांच्या उपस्थितीत आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्ह्यातील मराठा चेहरा असलेले तरुण,अभ्यासु आणि मनसेतुन जिल्ह्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षाला सोड़चिठी दिल्यानंतर देखील निष्ठेने पक्षाचे काम करणारे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. अंकुश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला प्रा. जाधव यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला परंतु त्यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला नव्हता तरी देखील गेल्या दोन महिन्यापासुन ते पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमाला हजर नव्हते त्यामुळे प्रा. जाधव कोणत्या पक्षात जाणार याविषयी उत्सुकता होती तर माजी आमदार चंद्रकांत दानवे हे शेतकरी, कष्टकरी,शेतमजुर या सह सर्व जाती धार्मास आणि अठरापगड़ जातीस न्याय देऊ शकतात त्यामुळेच त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे प्रा. डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले.या वेळी माजी खासदार श्री पुंडलिकराव दानवे,आमदार राजेश टोपे, माजी आमदार चंद्रकांत दानवे,सुदाम दादा सोनवने, युवा नेते सुधाकर दानवे,बबलू शेठ चौधरी,राष्ट्रवादीचे भोकरदन तालुकाध्यक्ष रमेशशेठ सपकाळ, लक्ष्मण ठोंबरे, जाफराबाद तालुकाध्यक्ष राजेश चव्हाण, रामधन पाटिल कळंबे ,अशोकराव पवार,राजेश पाटिल म्हस्के, सुरेखाताई लहाने,विजय मिरकर,प्रा.नसीम कादरी,अजहर शाह, महेश औटि, नसीम पठान,कदिर बापु, दिपक वाकडे, रामेश्वर वाघ, प्रकाश पा. मिरकर, दिलिप मिरकर,नाजेम शाह, अर्जुन शिंदे,विशाल पोटे आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें