मानवत येथील रक्तदान शिबीरात ३०५ जणांनी केले रक्तदान. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 17 नवंबर 2018

मानवत येथील रक्तदान शिबीरात ३०५ जणांनी केले रक्तदान.


मानवत / मुस्तखीम बेलदार

दि.१७: मानवत येथे स्वर्गिय नेञदिप नंदुभाऊ यांच्या जन्म दिनानिमित्त  रोग निदान  व  भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन आज दि.१७ नोव्हेंबर रोजी गोदावरी मंगल कार्यालय बांगड टॉकिज रोड येथे डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते यात सर्व रोग निदानसाठी २९७  नागरीकांनी याचा लाभ घेतला व ३०५ नागरीकांनी रक्तदान शिबीरात सहभाग घेतला.

या सर्वरोगनिदान व रक्तदान  शिबीराचे उदघाटन ह.भ. प .महामंडलेश्वर १००८  मनिषानंद पुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.एन बी दगडू हे होते . मधुमेह ,र्हदयविकार,दमा,अस्थमा,पोटविकार,नेञरोग तपासणी,स्ञीरोग ,अस्थिरोग,कान नाक घसा,त्वचारोग ,बालरोग आदी आजाराची रुग्ण  तपासणी  २९७ नागरीकांची  या वेळी करण्यात  आली तसेच  शहरातील सर्व सेवाभावी संस्था व विविध मिञमंडळानी   रक्तदान शिबीरात सहभाग घेऊन ३०५ जणांनी यात रक्तदान केले श्री. हुजुर साहेब रक्तपेढी परभणी
न्युलाईफ ब्लड बँक परभणी यांनी या  रक्तदान कार्यक्रमास सहकार्य केले.  कर्तव्यदक्ष नायबतहसिलदार नकुल वाघुंडे यांनी सहपत्नीक रक्तदान केले तसेच शहरातील व्यापारी,प्रतिष्ठित नागरीक ,अधिकारि ,सरपंच यांनी यावेळी  रक्तदान केले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठि  डॉ.नेञदिप दगडु चँरिटेबल ट्रस्टचे डॉ.नारायणसा दगडु ,डॉ.निनांद दगडु ,अँड गणेश मोरे पाटिल,कुलदिप दगडु ,विशाल कडतन यांच्यासह डॉकटरांनी  परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें