बदनापूर, :उपसंपादक : किन्होळा (ता. बदनापूर) शिवारातील माळरानावरील कपाशीच्या शेतात गांज्याच्या लागवड करण्यात आलेली 2 लाख 70 हजार रुपये किमतीची 60 ओली झाडे शेतातून उपटून बदनापूर पोलिसांच्या पथकाने जप्त केली आहे.
किन्होळा शिवारातील गट क्रमांक 73 मधील कपाशीच्या पिकात दादाराव गणपत भुजंग (रा.
किन्होळा ) याने गांज्याच्या झाडांची लागवड केल्याची माहिती माहिती मिळताच डीवायएसपी शिलवंत ढवळे व पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तेथे छापा मारला. तेथे कपाशीच्या शेतात आंतरपीक घेतल्यासारखे गांजाची झाडे दिसून आली. यानंतर पथकाने तज्ञांकडून खात्री करून गांजाची झाडे उपटून त्याची मोजणी केली. या कारवाईत पोलिसांनी गांजाच्या झाडांचे वजन 18 किलो भरले. बाजारभावाप्रमाणे जप्त केलेला मुद्देमाल 2 लाख 70 हजार रुपयांचा असावा, असा अंदाज व्यक्त केला. ही कारवाई बदनापूरचे नायब तहसिलदार संजय शिंदे यांच्या समक्ष झाली. यावेळी बदनापूर पोलिसांच्या पथकात फौजदार चैनसिंग गुसिंगे, पोलिस कर्मचारी शेख इब्राहिम, नितीन ढिलपे, सय्यद उस्मान, किशोर पुंगळे, गजानन बहुरे, अनिल चव्हाण, बाळासाहेब खंडागळे यांचा समावेश होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें