आरोपींना 15 नोहेंबर पर्यंत पोलिस कोठडी रिमांड.
शिर्डी/ प्रतिनिधी
सावळीविहिर बुद्रुक ग्रामपंचायत चा संगणक ऑपरेटर प्रकाश वाघमारे याच्या खुनाचा तपासात जवळच्या मित्रांनीच खून केल्याचे तपासात पुढे आले आहे.शिर्डी पोलिस स्टेशन चे पो.नि.अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवून या खुनात आठ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात चार आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते.अधिक माहिती अशी की,या आठही जणांवर खून करणे,पुरावा नष्ट करणे,अपहरण करणे व संघटितपणे कृत्य करणे या विविध कलमाखाली शिर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
ग्रामपंचतीत काम करणाऱ्या प्रकाश वाघमारे च्या खुनानंतर सावळीविहिर लगतच्या पाच गावात मोठा असंतोष तयार झाला होता.मयत वाघमारे हा प्रेमळ असल्याने त्याचा मोठा जनसंपर्क होता गरीब कुटुंबातील अविवाहित तरुणावर हा प्रसंग ओढावल्याने ह्या कुटुंबाच्या पाठीशी सारे गाव उभे राहिले होते.6 नोव्हेंबर ला मयत प्रकाश घराच्या बाहेर पडला.तो परत घरी आलाच नाही.दिवाळी असल्याने तो कोणाकडे गेला असावा असे घरच्यांना वाटले.शोधाशोध करूनही तो सापडला नाही.त्या नंतर त्याचा मृतदेह पोलिसांना निमगांव शिवारात मिळुन आला.पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले त्या नंतर त्याची ओळख पटली.गावकऱ्यांनी ह्या खुनाचा तपास करून मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी केली.पोलिसांनी या खुनात सहभागी असणाऱ्यांना शिताफीने अटक केली.त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आपली सर्व ताकत पणाला लावली.व रात्री उशिरापर्यंत या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून चौकशी करून खुनाची माहिती या आरोपींनी दिली.मृतदेहाचा इन कॅमेरा शवविच्छेदन लोणी येथे करण्यात आले.नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतल्या नंतर आरोपींची नावे सांगा,काय गुन्हा दाखल केला याची मागणी अंत्यविधी प्रसंगी गावकऱ्यांनी केली.पोलिसांनी अत्यंत शांततेत परिस्थिती हाताळून पो.नि.अरविंद माने यांनी आठ तरुणांना या खुनात अटक केली आहे.त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.याचा खुलासा केला त्यावर राहाता पंचायत समितीचे सदस्य ओमेश जपे,माजी उपसरपंच बाळासाहेब जपे,कैलास सदाफळ,प्रवीण बनसोडे, यांच्या ज्या शंका होत्या त्याचा खुलासा झाल्या नंतर अंत्यविधी करण्यात आला.काही काळ या वेळी तणाव निर्माण झाला होता.परंतु पोलिसांनी हे प्रकरण हाताळून आठ जणांना अटक केली आहे.पोलीस अत्यंत बारकाईने करत असलेल्या तपासाची माहिती दिली.त्यावर समाधान झाल्या नंतर मयत प्रकाश वाघमारे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या नंतर मयताच्या भाऊ राहुल सोपान वाघमारे याने शिर्डी पोलिसात फिर्याद दिली.त्या फिर्यादीवरून व अक्षय हनुमंते यानी दिलेल्या माहिती वरून आरोपींनी खून केला आहे या फिर्यादीवरून प्रकाश बंडू विसपुते (वय-32),अरबाज अनवर पठाण (वय-19),सागर नामदेव साळुंके (वय-23),प्रेम सुधाकर शेजवळ (वय-21) व अल्पवयीन आरोपी पंकज कल्याण जावळे,महेश प्रवीण पवार,प्रथमेश बबन घोरपडे,अनिकेत दिलीप जाधव यांच्या या खुनात सहभाग असल्याचे म्हटले.मयताचा खून करणे-भा.द.वि.302,पुरावा नष्ट करणे -भा.द.वि.201,अपहरण करणे-364 व संघटितपणे गुन्हा करणे -34 या प्रमाणे विविध कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आला त्या बरोबरच मयत प्रकाश वाघमारे याने शेवटचा फोन कोणाला केला होता,कोणाचे फोन आले होते त्या बरोबरच खुनात सहभागी असणाऱ्या आठ आरोपींनी त्यांच्या मोबाइल वरून कोना कोणाला फोन केले ते कोणाच्या सहवासात होते त्यांना ह्या काळात कोणी मदत केली,कोणी आश्रय दिला याची बारीक सारीक चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.त्यामुळे ह्या आठ जणांच्या सहवासात आलेल्या अनेकांनी धसका घेतला आहे.ह्या घटने नंतर पोलिसांनी जिल्हा पोलिस प्रमुख रंजनकुमार शर्मा,अप्परपोलिस अधीक्षक रोहिदास पवार,पो.नि.अरविंद माने,यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.मिथुन घुगे.प्रसाद साळवे.अजय अंधारे.बाबासाहेब सातपुते. हे ह्या प्रकरणाचा तपास करत आहे.
कोणालाही सोडणार नाही =सावळीविहिर ची घटना अत्यंत दुर्देवी आहे.ह्या प्रकरणाचा तपास पोलीस अत्यंत गंभीरपणे करत आहे.यात खुनाच्या घटने नंतर ह्या आठ जणांना कोणी मदत केली,ते कोणाच्या सहवासात होते त्यांनी कोणाला मोबाईल केले त्यांना कोणी आश्रय दिला खुनाची कारणे ह्या सर्व बाबी याचा तपास केला जात आहे.गुन्हेगार व पाठबळ देणारा व मदत करणारा कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल-स.पो.नी.मिथुन घुगे,शिर्डी.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें