सेलु (प्रतिनिधी) शहरातील पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे शहरातील चोरीच्या घटनेत वाढ झाली असल्यामुळे दिवसाढवळ्या दुचाकी पळवल्याची घटना सीसीटीवी मध्ये कैद झाली सेल शहरातील साईबाबा बँकेच्या मागच्या बाजूने येथील कर्मचारी अविनाश जाधव यांची मोटरसायकल क्रमांक एम ए च 22 m 98 18 सीडी डीलक्स घेऊन पसार झाल्याची घटना दिनांक 12 रोजी दुपारी 1:16ला घडली चोरांनी कशी दुचाकी पळवली येथील बँकेच्या बाजूला जनरेटरचा सहारा घेवुन रस्त्यावर कोणी नसल्याचे पाहून चक्क आपली स्वतःची गाडी असल्यासारखीच तो गाडी घेऊन पसार झाला.
यापूर्वीसुद्धा शहरांमध्ये चक्क एक लाख रुपयाची चोरी दिवसाढवळ्या झाली त्याचा ही तपास लावण्यात पोलिस विभागाना अपयश आले सीसीटीवी फुटेज असतानासुद्धा अद्याप पर्यंत पोलिसांना आरोपी सापडला नसून त्याचा तपास लागत नाही
पुन्हा चोरांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण चोरी केल्याचे सिद्ध करूनही आपले काहीच होत नाही हे लक्षात आल्यानेच चोरीच्या घटनेत वाढ होत आहे .
पोलीस विभाग पुरावा देऊन काहीही होत नसल्याने चोराचे मनोधैर्य वाढत आहे सीसीटीव्ही सारखा सबळ पुरावा असतानाही चोरांना पकडण्यात पोलिसांना अपयश असल्याचे दिसत आहे यामुळे येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें