चोरी करणाऱ्या त्या महिलेच्या चौविस तासाच्या आत आवळल्या मुसक्या. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 नवंबर 2018

चोरी करणाऱ्या त्या महिलेच्या चौविस तासाच्या आत आवळल्या मुसक्या.

भोकरदन  पोलिसांची  कारवाई,  चोरीस  गेलेला  तिस हजार  रुपयांचा  मुद्देमाल  जप्त  !


भोकरदन प्रतिनिधी  : भोकरदन  येथे दिनांक  24 शनिवार  रोजी दुपारी  सर्वज्ञ ज्वेलर्स मधुन इब्राहिमपुर  येथील  पंचायत  समितीच्या सदस्या  कमलबाई सत्यभान पगारे  यांचे   30 हजार  रुपये दोन  अज्ञात महिलेने  थैलितुन चोरले  होते,  त्या  नुसार  भोकरदन  पोलीस  ठाण्यात  ऋषिकेश  पगारे रा.   इब्राहिमपुर  याच्या  तक्रारी  वरुन  दोन  अज्ञात  चोरटय़ा महिला  विरुद्ध  दिनांक  24 नोव्हेंबर  रोजी  गुन्हा  दाखल  करण्यात  आला होता,  त्यानुसार  चोरीच्या  ठिकाणी   तात्काळ  पोलिसांनी  सर्वज्ञ ज्वेलर्स  मध्ये  जाऊन  सी सी टिव्ही  मध्ये  कैद  झालेल्या  महिलेचे  फुटेज प्राप्त  करून  तात्काळ  तपासाची  चक्रे फिरवून  संपूर्ण  जिल्हा  भरातिल सर्व  पोलीस  ठाण्याला  दोन्ही  संशयित  महिलेचे  फोटो  हाॅटसअॅप द्वारे पाठवले  होते.  त्यानंतर  सदर  दोन्ही  महिला  ह्या  वडीगोद्री  परिसरातील  असल्याची  खात्री  लायक  गोपनीय  माहिती  मिळाल्याने  वडीगोद्री  गाव  हे  पोलीस  ठाणे  गोंदि या  हद्दीत  असल्याने  तेथे  दिलेल्या  वस्ती  मध्ये  शोध  घेण्याबाबतची  माहिती  ही  सहपोलीस  निरक्षक  अनिल  परजणे  यांना  देउन  त्यांच्या  मदतीने   सदर दोन्ही  महिलांना   ताब्यात  घेतले  .  व  चोरी  गेलेले  30 हजार  रुपये  व  सी  .  सी  टिव्ही  फुटेजचे व्हिडिओ  व फोटो  पोलीसी खाक्या  दाखवताच  त्यांनी  केलेल्या  चोरीची  कबुली  दिली.  त्यानंतर  त्यांना  पकडून  भोकरदन  पोलीस  ठाणे  येथे  अणुन गुन्ह्य़ात  अटक केली आहे.  व  चोरीस  गेलेला  माल  30 हजार  रुपये  पोलीसांनी  हस्तगत  करण्यात  आले.  सदर  गुन्ह्याचा  तपास  पोलीस  हेड कॉन्स्टेबल  डि, जे. शिंदे  करित  आहे.  सदरील  कारवाई  ही  पोलीस  अधीक्षक  एस  चैतन्य,  मा. अप्पर पोलीस  अधीक्षक  समाधान  पवार व उपविभागीय पोलीस  अधिकारी  सुनील  जायभाये यांच्या  मार्गदर्शना  खाली पोलीस  निरीक्षक  दशरथ  चौधरी,  पोलीस  उपनिरीक्षक  ज्ञानेश्वर  साखळे ,  अमन  सिरसाट,  पोलीस  कर्मचारी  डि. जे.  शिंदे,  रामेश्वर  सिनकर ,  आय  बाईक  पथकाचे  गणेश  पायघण ,  सागर  देवकर,  पोलीस  ठाण्याचे  गणेश  निकम, महिला  पोलीस  कर्मचारी सुलाबाई मारकड, संगीता  मोकाशे चालक  पोहेका  सुर्यवंशी,  व  पोलीस  ठाणे  गोंदि  येथील  सहपोलीस  निरक्षक  अनिल  परजणे, पोलीस  उपनिरीक्षक  हनुमंत  वारे, त्यांच्या  स्टाफ  ने कारवाई  कामी  मदत  केली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें