मरण पाहत जगणं किती क्लेशदायक : रवि बापटले, स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्काराचे सेलूत वितरण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 25 नवंबर 2018

मरण पाहत जगणं किती क्लेशदायक : रवि बापटले, स्वातंत्र्यसेनानी चारठाणकर पुरस्काराचे सेलूत वितरण.



सेलू प्रतिनिधी

मरण पाहत जगणे किती क्लेशदायक असते असे अनूभवसिध्द बोल सांगत एच.आय.व्ही पिडीत बालकांच्या दुःखाबद्दलची कळकळ सामाजिक कार्यकर्ते रवी बापटले यांनी व्यक्त केली. हे ऐकताना श्रोते  हेलावून गेले.समाजाने अशा सेवाकार्यासाठी सदैव दक्ष राहण्याची गरज आहे , अशी कळकळीची विनंती त्यांनी केली.

सेलू  येथील स्वातंत्र्य सेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानच्या ३१ व्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
सेलू येथे शनिवारी दिनांक २४नोव्हेबर रोजी केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार भालचंद्र पिंपळवाडकर यांची उपस्थिती होती
प्रतिवर्षीप्रमाणे मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक, कला, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ठ योगदानाबद्दल प्रतिष्ठान तर्फे नाट्यचित्रपट अभिनेता संकर्षण क॒हाडे , डॉ ऋषिकेश कांबळे , समाजसेवक रवि बापटले यांना स्वातंत्र्य सेनानी विनायकराव चारठाणकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले.रोख रूपये पाच हजार एक,शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
व्यासपीठावर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वर्षा देशपांडे, चिटणीस ॲड श्रीकांत वाईकर, सत्कारमुर्ती
यांची प्रमुख उपस्थिती होती
श्री.पिंपळवाडकर यांनी समाजात अनेक चांगल्या व्यक्ति व्रतस्थ असतात त्यांचे समाजाप्रती योगदान अतुल्य असतेच.ही सामाजिक संवेदना प्रत्यकाने जपली पाहिजे, असे नमूद केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन जयश्री सोन्नकर यांनी केले तर   अॅड श्रीकांत वाईकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी विश्वस्त मंडळाचे आर.आर.चारठाणकर, बाबासाहेब चारठाणकर, किशोर जवळेकर, प्रा.प्रकाश कामतीकर बी.एस.देशपांडे ,वरुणा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.
स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर प्रतिष्ठानच्या पुरस्काराने रवि बापटले , ऋषिकेश कांबळे, संकर्षण कर्‍हाडे  यांना गौरविण्यात आले.यावेळी उपस्थितीत ॲड श्रीकांत वाईकर, वर्षा देशपांडे .

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें