कर्मवीर दादासाहेब सबळीकरण योजनेअंतर्गत लाभार्थांना जमिन वाटप.=समाजकल्याण विभाग. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 नवंबर 2018

कर्मवीर दादासाहेब सबळीकरण योजनेअंतर्गत लाभार्थांना जमिन वाटप.=समाजकल्याण विभाग.

जिल्हाधिकारी पि.शिवशंकर यांचे हस्ते जमिन आदेश चे  वाटप.


 ( विशेष प्रतिनिधी ) समशेर खान

       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या कर्मवीर दादासाहेब सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडून सन २०१७-१८ मधील विक्रीसाठी प्राप्त अर्जाप्रमाणे सन १८-१९ मध्ये खरेदी केलेल्या जमिनीचे लाभार्थांना वाटप आदेश व प्रमाणपत्र दि.२६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी पि.शिव शंकर यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
                   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णायाप्रमाणे अनुसूचित जाती ,नवबौध्द प्रवर्गातील  दारिद्रयरेषेखालील भूमिहीन कुटुंबाना ४ एकर कोरडवाहु किंवा २ एकर बागायती जमिन देण्याची योजना आहे. या घटकातील लाभार्थांना उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून त्यांचे उत्पन्न वाढवावे व  जिवनमान उंचवावे अशी हि योजना आहे. सन २०१७-१८ या वर्षात २४ एकर २४ गुंठे जमिन विक्री प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाजकल्यान कर्यालयास प्राप्त झाले होते .हि जमिन सन २०१८-१९ मध्ये खरेदी केली आहे .जिल्हाधिकारी कार्यालयात या लाभार्थांना जिल्हाधिकारी पि शिवशंकर यांचे हस्ते २६ नोव्हेंबर संविधान दिनी या  जमिन चे लाभार्थांना वाटप आदेश व  प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले यावेळी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर ,समाजकल्याण अधिकारी गट ब अमित घवले ,वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती एल.एस.गायके यांची उपस्थीती होती.
    दिनांक १४ आँगष्ट २०१८ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने.सन २०१८-१९ साठी.सहाय्यक आयुक्त समाजकल्यान कार्यालयास परभणी जिल्ह्यामध्ये  ८८७ एकर जमिन विक्री चे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत .तसेच जमिन मागणीचे  ६०० लाभार्थी मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत.यासर्व अर्जाच्या पात्र ,अपात्रते  बाबत छाननी प्रक्रिया अंतीम टप्यात असुन या बाबत तात्काळ कार्यवाही पुर्ण करून पात्र प्रस्तावा प्रमाणे जमिनी खरेदी करुन शासन निर्णयाप्रमाणे पात्र लाभार्थांना जमिनी वाटप केले जाईल अशी माहिती  सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें