सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने संविधान रॅली . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 26 नवंबर 2018

सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या वतीने संविधान रॅली .



 ( विशेष प्रतिनिधी )  शमशेर खान
                   
 येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय व बार्टी यांच्यावतीने संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथुन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे  यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून संविधान रँलीचा शुभारंभ करण्यात आला.
            प्रारंभी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर ,समाज कल्याण अधिकारी गट ब अमित घवले ,बार्टीचे द.फ.लोंढे,भिमराव वायवळ ,अँड. देशमुख यांची उपस्थिती होती . सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांना संविधानाचे पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले .त्यानंतर संविधान रॅलीचा शुभारंभ झाला. या रँलीमध्ये  कर्मचारी ,बार्टी चे समतादुत ,वसतीगृहातील विद्यार्थ्यांचा  सामावेश होता. यावेळी " उठ नागरीक जागा हो ,संविधानाचा धागा हो "अशा घोषणा देण्यात आल्या या रॅलीचा समारोप सामाजिक न्याय भवन येथील सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात करण्यात आला. अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर हे होते प्रमुख पाहुणे म्हणून भिमराव वायवळ ,स.क.अ. गट ब अमित घवले ,बार्टीचे प्रकल्प अधिकारी द.फ.लोंढे  यांची उपस्थिती होती.यावेळी भिमराव वायवळ ,द.फ.लोंढे ,तेजस माळवदकर यांनी संविधान बाबत विचार व्यक्त केले त्यानंतर  उद्देशपत्रीकेचे वाचन करून समारोप करण्यात आला.सुत्रसंचलन व्हि. आर. रणबावरे यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख व्हि.एस.पकाणे याच्यासह कार्यालयातील कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें