शिंदेवाडी येथील राहुल सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 नवंबर 2018

शिंदेवाडी येथील राहुल सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन संपन्न.

आयुष्य सुखकर हाेन्यासाठी वाचन उपयुक्त ठरते-विजयसिंह परबत.


सोनपेठ (राजेश खेडकर) दि.१४नोव्हेंबर २०१८

शिंदेवाडी ता.माढा येथील शासनमान्य राहुल सार्वजनिक वाचनालय शिंदेवाडी  ता.माढा येथे सालाबाद प्रमाने याही महाराष्ट्राचे हास्यसम्राट पु.ल.देशपांडे यांच्या जन्मदिनानिमित्त दुर्मीळ ग्रंथाचे व दिवाळी अंकाचे ग्रंथप्रदर्शन २०१८ चे उदघाटन कै.कृष्णराव परबत प्रतिष्ठान कुर्डुवाडी चे अध्यक्ष विजयसिंह परबत यांच्या हस्ते दीपावली पाडव्या निमित्ताने करन्यात आले. यावेळी कार्यमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय सावंत हाेते.
आधुनिक युगात वाचन हे आवश्यक बनले आहे. आयुष्य हे सुखकर हाेन्यासाठी काेनतेही वाचन हे आत्मबळ देनारे असते. सवयी व विचार बदलनारी मानसिकता वाचनामुळे तयार हाेते. आत्मिक समाधान मिळन्यासाठीही वाचन आवश्यक आहे, असे मत विजयसिंह परबत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
वाचनालय करीत असलेले उपक्रम लाेकाभिमुख असून ग्रामस्थांनी या वाचनालयातील ग्रंथ संपदेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
     या कार्यक्रमात सरपंच संजय सावंत, रामभाऊ शिंदे, संजय भांगे, सौदागर शिंदे, रोहन साळुंके, ऊत्तम शिंदे, अर्जुन शिंदे, किशोर शिंदे, बिभिशण शिंदे, अजय शिंदे, रोहित साळुंके, ग्रंथपाल राजेंद्र जाधव आदिंसह वाचनप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित हाेते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष कांतिलाल साळुंके यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें