सेलू प्रतिनिधी.दि.14/11/2018.
ग्राम विकासासाठी नियोजन महत्त्वाचे असून सर्व गावक-यांनी विचारपूर्वक नियोजन करून ग्राम सभेमध्ये ठराव घ्यायला पाहिजेत आणि त्या पध्दतीने कामं केली तर प्रत्येक गाव आदर्श गाव व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन जे.एस.देशमुख यांनी केले.
सेलू तालुक्यातील केमापूर येथे दि.14 नोव्हेंबर रोजी आमचे गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत ग्राम सभा घेण्यात आली यावेळी ग्रामविकासाधिकारी जे.एस.देशमुख यांनी ग्रामसभेत मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीरी,शौचालय व त्याचा वापर,पाणी पुरवठा व पाणी बचती संदर्भात मार्गदर्शन केले ग्रामसभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. उमेदचे विक्रांत कुकडे यांनी उमेदच्या विविध योजनांची व अस्मिता योजनेची माहिती दिली.यावेळी ग्रामसभेला पर्यवेक्षक म्हणून गोविंद चांदजकर कनिष्ठ लिपिक पं.सं.सेलू,मुख्याध्यापक शरद ठाकर,सुमेध पाटील, ग्रा.पं.सदस्य गावकरी महिला व पुरुष उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें