मंत्रीमंडळ विस्ताराचा नवा मुहुर्त शुक्रवार किंवा शनिवार? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 14 नवंबर 2018

मंत्रीमंडळ विस्ताराचा नवा मुहुर्त शुक्रवार किंवा शनिवार?

मंत्रीमंडळ विस्ताराचा नवा मुहुर्त शुक्रवार किंवा शनिवार?

बुधवार, 14 नोव्हेंबर 2018
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. पितृपक्षात होणारा विस्तार पुढे ढकलून तो घटस्थापनेनंतर केला जाणार असल्याचे सांगितले गेले. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे परदेशात गेल्यामुळे ते आल्यावर हा विस्तार होईल असे सांगत पुन्हा तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर दसऱ्याचा मुहुर्त काढण्यात आला, पण तो ही हुकला.

औरंगाबाद : भाजप-शिवसेना युती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला काही केल्या मुहुर्तलागेना. यापुर्वी अनेकदा विस्ताराच्या चर्चा झाल्या पण त्या अफवाच ठरल्या. त्यामुळे या विस्तारात ज्यांच्या नावाची चर्चा केली जाते, त्या आमदारांनी देखील आता मंत्रीमंडळ विस्ताराचा विषय काढला की हात जोडायला सुरूवात केली आहे. रखडलेल्या या मंत्रीमंडळ विस्ताराचा नवा मुहुर्त पुन्हा एकदा समोर आला आहे. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो असे बोलले जात आहे.

राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. पितृपक्षात होणारा विस्तार पुढे ढकलून तो घटस्थापनेनंतर केला जाणार असल्याचे सांगितले गेले. पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे परदेशात गेल्यामुळे ते आल्यावर हा विस्तार होईल असे सांगत पुन्हा तो पुढे ढकलण्यात आला. त्यानंतर दसऱ्याचा मुहुर्त काढण्यात आला, पण तो ही हुकला.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांना देखील संभाव्य मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? होणार की नाही? असे प्रश्‍न विचारले गेले. त्यावर त्यांनी देखील ठामपणे विस्तार होणारच आहे, असे सांगत दिवाळीपूर्वीचे संकेत दिले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार नक्की होणार म्हणून इच्छुकांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. पण दिवाळीतही मंत्रीमंडळ विस्ताराचे फटाके काही फुटले नाही. आता दिवाळी उलटली तरी विस्ताराच्या हालाचाली होतांना दिसत नाहीयेत. या आधीचे सगळे मुहुर्त हुकल्यामुळे आता तरी विस्तार होणार का? याबद्दल ज्यांची नावे चर्चेत आहेत तेच साशंक आहेत.

मराठवाड्याला आशा?
सध्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात मराठवाड्याला तीन कॅबीनेट व एक राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, संभाजी पाटील निलंगेकर, शिवसेनेचे अर्जून खोतकर यांची त्यावर वर्णी लागली होती. या शिवाय विधानसभेचे अध्यक्षपद देखील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांच्याकडे आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी औरंगाबादच्या विजया रहाटकर तर भाजपचे प्रदेशाध्यक्षपद जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याकडे आहे.

मंत्रीमंडळ व पक्षीय पातळीवर देखील महत्वाची पदे मराठवाड्याच्या वाट्याला आली आहेत. बहुचर्चित मंत्रीमंडळ विस्तारात देखील एक राज्यमंत्रीपद मराठवाड्याला मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यात प्रामुख्याने औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस सुरजितसिंह ठाकूर, हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांची नावे आघाडीवर आहेत.

आठवडा अखेरीस मंत्रीमंडळ विस्तार शक्‍य- अतुल सावे
या संदर्भात भाजप आमदार अतुल सावे यांना विचारले असता येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्‍यता असल्याचे त्यांनी सांगितले. संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारात आपला समावेश होणार का? यावर हसत त्यांनी तो निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचे सांगितले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें