गोरगरिबांच्या अडी - अडचणी सोडविण्यात नगरपरिषद तत्पर -- नगराध्यक्ष अब्दुल समीर; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 30 नवंबर 2018

गोरगरिबांच्या अडी - अडचणी सोडविण्यात नगरपरिषद तत्पर -- नगराध्यक्ष अब्दुल समीर;

सिल्लोड नगरपरिषद महाराष्ट्रात आपल्या कामांचा ठसा उमटवेल -- नगराध्यक्ष अब्दुल समीर;

युवक काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानास उदंड प्रतिसाद ;

सिल्लोड (प्रतिनिधी)29
गोरगरिबांच्या विविध अडी - अडचणी सोडविण्यासह शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सिल्लोड नगरपरिषद अहोरात्र काम करीत असुन जगप्रसिद्ध अजिंठा लेणीमुळे पर्यटनाच्या माध्यमातून सिल्लोड शहर एक स्वच्छ शहर - सुंदर शहर बनविण्यासाठी आपल्या सर्व शहरवासियांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रात सिल्लोड शहर नगरपरिषद एक नंबरची नगरपरिषद असेल अशी आपणास ग्वाही देत आपल्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत तात्काळ उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद नेहमीच अग्रेसर असल्याचे मत नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी व्यक्त केले.
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड शहरात जनसंपर्क अभियानास सिल्लोड शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. जनसंपर्क अभियानाचे सिल्लोड शहरातील नागरिकांनी ठिक ठिकाणी स्वागत केले जात असुन शहरातील नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेतल्या जात असुन नगरपरिषदअंतर्गत विविध विकास योजना राबविण्यात येत असुन विविध अडी अडचणींवर तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे .

सिल्लोड शहरातील गणेश कॉलनी - माळी गल्ली - डाँ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कॉर्नर बैठकीत मार्गदर्शन करतांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नागरिकांच्या विविध अडी अडचणी समस्या जाणून घेत तात्काळ विविध अडी - अडचणी समस्या सोडविण्यात येईल असे उपस्थितांना मार्गदर्शनप्रसंगी सांगितले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बनसोड,विठ्ठलराव सपकाळ, नगरसेवक रऊफ बागवान, रईस मुजावर पठाण, सलिम हुसैन, शांतीलालजी अग्रवाल, सत्तार हुसेन,संजय आरके,अमित आरके, संजय मुरकुटे,राजेंद्र बन्सोड,मनोहर आरके, अकिल देशमुख,दशरथ सुरडकर, कुणाल सहारे ,मतीन देशमुख,अॅड.जी.एस.आरके,गणेश डकले, राजेश्वर आरके, फईम पठाण,अशोक बन्सोड,जितू आरके, जगन्नाथ कुदळ,मधुकर बेंडाळे,हाजी मोहम्मद हनिफ,राधेश्याम अग्रवाल,शेख बबलू,रवि आरके, तौसिफ पठाण,जे एस आरके, धम्मा दांडगे, शेषराव आरके,पडिंत आरके, उत्तमराव आरके, विठ्ठल गुरूजी,सोमाजी आरके, शंकर आरके, अशोक आरके, जुम्मा पठाण,देविदीस आरके, विश्वनाथ आरके, साहेबराव आरके, सुरेश आरके ,रखमाजी आरके , अनिल संपत साबळे,बाबूराव आरके,प्रदिप आरके, भिमराव आरके, तेजराव आरके, शैलेश आरके, अशोक भिका जगताप, भिमराव नामदेव जगताप, गणेश आरके, मुकुंदा आरके सुनिल आरके, सचिन आरके, संदिप आरके, संजय अंबादास आरके,आदिंसह पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें